Home /News /money /

लॉकडाऊनमध्ये सावधपणे खर्च करण्याचे प्रमाण वाढले, परंतू ऑनलाइन खरेदीत भारतीय अव्वल

लॉकडाऊनमध्ये सावधपणे खर्च करण्याचे प्रमाण वाढले, परंतू ऑनलाइन खरेदीत भारतीय अव्वल

लॉकडाऊनच्या (Coronavirus Lockdown) काळात अनेकांनी बचतीचा मार्ग अवलंबला आहे. लॉकडाऊननंतर भारतीय विचारपूर्वक खर्च करत आहेत पण ऑनलाइन खरेदीमध्ये देखील भारतीयांनी आघाडी घेतली आहे.

    मुंबई, 25 सप्टेंबर : कोरोना व्हायरस (Coronavirus) आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी बचतीचा मार्ग अवलंबला आहे. लॉकडाऊननंतर भारतीय विचारपूर्वक खर्च करत आहेत पण ऑनलाइन खरेदीमध्ये देखील भारतीयांनी आघाडी घेतली आहे. जगभरातील विविध बाजारांमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार लॉकडाऊनमध्ये सवलती मिळाल्यानंतर 74 टक्के भारतीय ऑनलाइन खरेदीबाबत सकारात्मक आहेत. जगभरात हे प्रमाण 64 टक्के  आहे. जगभरातील 12 बाजारपेठांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आलं त्यात असं लक्षात आलं की लॉकडाउनच्या काळातही भारतीय ऑनलाइन खरेदीत आघाडीवर आहेत. हाँगकाँग, भारत, इंडोनेशिया, केनिया, चीन, मलेशिया, पाकिस्तान, सिंगापूर, तैवान, यूएई, ब्रिटन आणि अमेरिका या बाजारपेठांमध्ये हा अभ्यास करण्यात आला. (हे वाचा-दोन महिन्यातील सर्वात कमी स्तरावर पोहोचले सोन्याचे दर,वाचा आज काय होणार बदल) दरम्यान ही महामारी आल्यानंतर पैसे विचारपूर्वक खर्च करण्याचं प्रमाणा वाढलं असून ते भारतामध्ये 90 टक्के नागरिक विचारपूर्वक खर्च करत आहेत. तर जगभरात विचारपूर्वक पैसे खर्च करण्याचं प्रमाण 75 टक्के आहे. जुलै महिन्यात पैसे सावधपणे खर्च करण्याचं जगातलं प्रमाण 46 टक्के होतं तर भारतीयांचं प्रमाण 56 टक्के होतं. अर्थव्यवस्थेवर कोरोनामुळे झालेल्या परिणामांमुळे नागरिक सतर्क कोव्हिड-19 चा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे का असा प्रश्न स्टँडर्ड चार्टर्ड बँकेनी (Standard Chartered Bank Survey) केलेल्या या सर्वेक्षणात विचारण्यात आला. त्याला 76 टक्के लोकांनी होकारार्थी उत्तर दिलं. लोक आपले पैसे विचारपूर्वक खर्च करण्यामागे हेच कारण आहे. कॅशलेस व्यवहार वाढतील येत्या पाच वर्षांमध्ये कॅशलेस व्यवहारांत वाढ होईल का या प्रश्नाला भारतीयांनी सकारात्मक उत्तर दिलं असून, 87 टक्के भारतीयाचं असं मत आहे की येत्या पाच वर्षांत भारतात कॅशलेस व्यवहारांचं प्रमाण वेगाने वाढेल. जगातल्या केवळ 64 टक्के लोकांनाच कॅशलेस व्यवहारांचं प्रमाण वाढेल असं वाटतं. (हे वाचा-बँक खात्यातून चोरी झाल्यानंतर हे काम केल्यास मिळतील तुमचे पैसे,RBIने दिली माहिती) कोरोना काळाच्या आधीच्या परिस्थितीच्या तुलनेत सुट्टीत फिरायला जाणाचं प्रमाण कोरोनानंतर घटलं आहे असं 64 टक्के भारतायांचं म्हणणं आहे. तर 30 टक्के लोकांनी चैनीसाठी खर्च करण्याचं प्रमाण कमी केलं आहे. जगभरातील 42 टक्के लोकांनी फिरण्याचा आणि चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च करण्याचं प्रमाण कमी केलं आहे. जगभरात केवळ 55 टक्के लोकांनी नवे कपडे खरेदी केले आहेत तर नवे कपडे खरेदी करणाऱ्या भारतीयांचं प्रमाण 56 टक्के आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus, Lockdown

    पुढील बातम्या