मराठी बातम्या /बातम्या /मनी /1 ऑक्टोबरपासून या सरकारी बँकेत होतोय मोठा बदल, तुमचंही खातं असेल तर जाणून घ्या

1 ऑक्टोबरपासून या सरकारी बँकेत होतोय मोठा बदल, तुमचंही खातं असेल तर जाणून घ्या

अलाहाबाद बँकेच्या आयएफएससी कोडमध्ये 1 जुलैपासून बदल झाला आहे. दरम्यान आता ग्राहकांच्या चेकबुक (Chequebook) आणि एमआयसीआर कोडमध्ये (MICR Code) बदल होत आहेत.

अलाहाबाद बँकेच्या आयएफएससी कोडमध्ये 1 जुलैपासून बदल झाला आहे. दरम्यान आता ग्राहकांच्या चेकबुक (Chequebook) आणि एमआयसीआर कोडमध्ये (MICR Code) बदल होत आहेत.

अलाहाबाद बँकेच्या आयएफएससी कोडमध्ये 1 जुलैपासून बदल झाला आहे. दरम्यान आता ग्राहकांच्या चेकबुक (Chequebook) आणि एमआयसीआर कोडमध्ये (MICR Code) बदल होत आहेत.

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट: बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया अनेक ग्राहकांसाठी त्यांच्या बँकिंग व्यवहारात बदल करणारी ठरली आहे. तुमचंही यापैकी महत्त्वाच्या एका सरकारी बँकेत (Government Bank) खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी इंडियन बँकेत (Indian Bank) अलाहाबाद बँकेचे (Allahabad Bank) विलीनीकरण केले होते. ज्यानंतर ग्राहकांच्या चेकबुक आणि एमआयसीआर कोडमध्ये (MICR Code) बदल होत आहेत. इंडियन बँकेत अलाहाबाद बँकेचे विलीनीकरण झाल्यानंतर अलाहाबाद बँकेचा एमआयसीआर कोड आणि चेकबुक 1 ऑक्टोबर 2021 पासून बंद होणार आहे. इंडियन बँकेने याआधी ट्वीट करून देखील या बदलासंदर्भात माहिती दिली होती.

त्यामुळे बँक ग्राहकांना नवीन चेकबुक मिळवणे आवश्यक आहे. जेणेकरून कामाचा खोळंबा टाळता येईल. बँक ग्राहकांना चेकसाठी ऑनलाइन देखील अप्लाय करता येणार आहे. तुम्ही इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून चेकबुकसाठी अप्लाय करू शकता.

हे वाचा-1000 रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळवा लाखोंचा फंड, काय आहेत Investment साठी पर्याय?

इंडियन बँकेने काय केलं आहे ट्वीट?

बँकेने केलेल्या ट्वीटमध्ये बँकेकडून नवीन चेकबुक कलेक्ट करण्याबाबत म्हटले आहे. 1 ऑक्टोबरपासून अलाहाबाद बँकेच्या ग्राहकांना त्यांचे जुने चेकबुक वापरता येणार नाही आहे. त्यामुळे चेकबुक वापरुन पैसे ट्रान्सफर करता येणार नाही. तुम्ही जवळच्या शाखेतून किंवा ऑनलाइन पद्धतीने चेकबुक मिळवू शकता.

एमआयसीआर कोड म्हणजे काय?

MICR कोड म्हणजे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन. हा एक 9 अंकी कोड असतो. बँकेच्या शाखेची ओळख या कोडद्वारे (इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टिम) केली जाते. यामध्ये बँक कोड, खात्याचा तपशील, रक्कम आणि चेक क्रमांक इत्यादी माहिती असते. हा कोड तुमच्या चेकवरील खालील भागात असतो. पहिले तीन अंक शहर, नंतरचे तीन अंक बँक आणि शेवटचे तीन अंक ब्रँचची ओळख करून देतात.

हे वाचा-तुमच्याकडेही आहे PF खातं? एका तासात मिळतील 1 लाख रुपये, वाचा कसं कराल अप्लाय

अलाहाबाद बँकेच्या आयएफएससी कोडमध्ये 1 जुलैपासून बदल झाला आहे. तुमचे आर्थिक व्यवहार सुरू ठेवण्यासाठी आयएफएससी कोड अत्यंत आवश्यक आहे. अद्याप तुम्ही नवीन IFSC कोड काय आहे हे जाणून घेतले नसेल तर अवश्य माहित करून घ्या. जवळच्या बँक शाखेत जाऊन किंवा www.indianbank.in/amalgamation या लिंकवर जाऊन तुम्हाला हा कोड तपासता येईल.

First published:

Tags: Bank, Bank details, Money