Home /News /money /

Term Insurance निवडताना नेमकं काय पाहावं? चांगली विमा पॉलिसी कशी निवडायची?

Term Insurance निवडताना नेमकं काय पाहावं? चांगली विमा पॉलिसी कशी निवडायची?

धकाधकीच्या जीवनात Term Insurance ही महत्त्वाची गोष्ट झाली आहे. मुळात टर्म इन्शुरन्स म्हणजे काय, तो Life insurance पेक्षा वेगळा असतो का? आपल्याला सुयोग्य पॉलिसी कशी निवडायची? काय करावं आणि करू नये याविषयी सर्व काही...

  दिल्ली, 12 मे: भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) च्या 2019 च्या आकडेवारीनुसार भारतात विमा योजना घेणाऱ्यांचे प्रमाण जगातील सर्वाधिक कमी देशांपैकी एक म्हणजेच3.69% इतके कमी आहे. परंतु 2014 पासून ते हळूहळू वाढत आहे. इंडियन ब्रँड इक्विटी फाउंडेशनच्या अहवालानुसार ही संख्या 2023 पूर्वी 5.3% च्या चक्रवाढ वार्षिक वाढ दराने (CAGR) वाढेल. भारतीय लोक सामान्यतः विम्याला चैनीची गोष्ट मानत असले तरी, अलिकडच्या काळाने विमा योजनेशिवाय आपली किती अवघड परिस्थिती होऊ शकते हे दाखवून दिले आहे. बाजारात विविध विमा योजना असताना योग्य योजना निवडणे अवघड होऊ शकते. तुमच्या पर्यायांचे मूल्यमापन सुरू करताना टर्म इन्श्युरन्स हा एक चांगला पर्याय आहे. टर्म इन्शुरन्स - ते काय आहे? टर्म इन्शुरन्स विशिष्ट कालावधीसाठी संरक्षणाची हमी देतो. पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या वेळेत विमाधारकाचे निधन झाल्यास मृत्यू लाभ म्हणजेच डेथ बेनीफिट दिला जातो. तसे न झाल्यास टर्म इन्शुरन्स विम्याची मुदत संपल्यावर त्याचे नूतनीकरण केले जाऊ शकते. पॉलिसीचे नूतनीकरण करताना प्रीमियमची रक्कम पॉलिसीचे मूल्य (पेआउट रक्कम) आणि विमाधारकाचे वय, आरोग्य, लिंग, पूर्व-अस्तित्वातील वैद्यकीय परिस्थिती आणि सर्वसाधारणपणे वैद्यकीय इतिहास यासारख्या घटकांच्या आधारे पुन्हा मोजली जाते. या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी सामान्यतः वैद्यकीय तपासणी केली जाते आणि विमा कंपनीला विमाधारकाचा व्यवसाय, धूम्रपानाच्या सवयी, कौटुंबिक इतिहास इत्यादी माहिती असणे आवश्यक असते.

  वाचा- शेअर बाजारात गुंतवणुकीची जोखीम नको, मग गुंतवणुकीचे 'हे' पर्याय तुमच्यासाठी ठरतील फायदेशीर

  भारतातील बहुतांश टर्म इन्शुरन्स योजना १८-६५ वयोगटातील लोकांसाठी आहेत. प्रत्येक योजनेबरहुकुम कमाल वयोमर्यादा वेगवेगळी आहे पण साधारणपणे ८५-९९ वर्षे इतकी आहे. विमा योजनेची मुदत ५-५० वर्षे असू शकते आणि सम अॅश्युअर्ड रक्कम २० लाख रुपयांपासून १ कोटी किंवा त्याहूनही अधिक असू शकते. टर्म इन्शुरन्सचे लाभ तुम्ही टर्म इन्शुरन्स योजना खरेदी करण्याचा विचार करण्यापूर्वी, सगळ्या गोष्टींचा साधकबाधक विचार करणे आवश्यक आहे. टर्म इन्शुरन्सचे काही प्रमुख फायदे येथे आहेत:
  • कर लाभ – कलम ८०सी आणि कलम ८०डी अंतर्गत भरलेल्या टर्म इन्शुरन्स प्रीमियमवरील कर लाभांचा दावा केला जाऊ शकतो. एकरकमी पेआउट, जी पॉलिसीनुसार विमा रक्कम आहे, आयकर कायद्याच्या कलम १०(१० डी) च्या अन्वये राहून कर-सवलत आहे.
  • परवडणारे प्रीमियम - टर्म इन्शुरन्स योजनांसाठी प्रीमियम अधिक परवडणारे आहेत. याचा अर्थ असा की तुमचा परतावा भरलेल्या प्रीमियमच्या तुलनेत जास्त आहे.
  • तुलनेने जास्त संरक्षण - पारंपारिक जीवन विमा योजना (ULIP किंवा अन्य) तुमच्याकडून कव्हरेज रकमेच्या ७-१०%प्रीमियम म्हणून आकारतात. जर वार्षिक प्रीमियम १०,००० रु. असेल तर त्या योजनेचे कव्हरेज म्हणजेच विमा संरक्षण फक्त रु. १ लाख. असते. तुलनेने  टर्म इन्शुरन्स सर्वसाधारणपणे १०-२०,००० मधील प्रीमियम वर मोठा दिलासा देत १ कोटी रुपयांपर्यंतचे कव्हरेज म्हणजेच विमा संरक्षण देतात.
  • गंभीर आणि अंतिम आजारांवर संरक्षण मिळू शकते- जर गंभीर आजाराचा टर्म इन्शुरन्स योजनेत समावेश केला असेल तर योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही गंभीर आजाराचे किंवा अंतिम आजाराचे निदान झाल्यावर एकरकमी पेआउट मिळते.
  टर्म इन्शुरन्स योजनांची वैशिष्ट्ये आधी नमूद केल्याप्रमाणे परवडणारी किंमत हे कदाचित टर्म इन्शुरन्सचे सर्वात ठळक वैशिष्ठ्य आहे. टर्म इन्शुरन्स योजना ठराविक कालावधीसाठी असल्याने, एक विशिष्ट रक्कम भरली जाते आणि प्रीमियम लॉक केला जातो. त्यामुळे योजनेच्या संपूर्ण कालावधीसाठी वर्षानुवर्षे समान रक्कम आकारली जाईल.

  वाचा -  तुमच्याकडे असलेली 500 रुपयांची नोट नकली तर नाही? व्हायरल मेसेजचं सत्य जाणून घ्या

  पेमेंटची लवचिकता हे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. विमाधारक त्यांना कधी प्रीमियम पेमेंट करायचे आहे, वार्षिक, अर्धवार्षिक, त्रैमासिक, मासिक किंवा साप्ताहिक अशा कशा प्रकारे करायचे आहे याची निवड करू शकतो. स्टॅगर्ड क्लेम पेआउट हे टर्म इन्शुरन्सचे आकर्षक वैशिष्ट्य आहे. या पर्यायानुसार, विमाधारक विम्याची रक्कम कशी मिळेल म्हणजेच ती एकरकमी, मासिक किंवा वार्षिक कशाप्रकारे मिळेल हे ठरवू शकतो. हे एकरकमी आणि उत्पन्नाचे मिश्र किंवा सुरुवातीच्या काळात वाढणारे उत्पन्न या स्वरूपात देखील असू शकते. त्यामुळे वारसांसाठी पेआउटची देखभाल करणे सोपे होते. बेसिक लेव्हल टर्म प्लॅन किंवा वाढत जाणारे टर्म प्लॅन आणि परिवर्तनीय टर्म प्लॅन यांसारख्या विविध प्रकारच्या टर्म इन्शुरन्स योजना उपलब्ध आहेत. या सर्वांमधील फरक हा आहे की पॉलिसीचा भाग म्हणून ही विविध वैशिष्ट्ये कशा प्रकारे काम करतात आणि त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारची योजना हवी आहे आणि त्या योजनेची वैशिष्ट्ये कशी कार्य करतात याचे संशोधन करणे महत्त्वाचे आहे. काय करावे आणि काय करू नये
  • तुमची योजना शक्य तितक्या लवकर घेता येत आहे का हे बघा - तुम्ही तुमची टर्म इन्शुरन्स योजना जितक्या लवकर घ्याल तितके तुम्ही अधिक निरोगी असल्यामुळे तुम्हांला कमी प्रीमियम भरावे लागेल.
  • एकच प्रीमियम पेमेंट योजना खरेदी करू नका - एकरकमी पेमेंटपेक्षा नियमित प्रीमियम पेमेंट असलेली योजना खरेदी करा. ते आर्थिक नियोजनासाठी उत्तम आहे.
  • टर्म इन्शुरन्स रायडर्सने डगमगून जाऊ नका- अतिरिक्त कव्हर स्वतंत्र आधारावर उपलब्ध आहेत. महागड्या टर्म प्लॅनला फक्त रायडर्स उपलब्ध आहेत म्हणून घाबरू नका.
  • पॉलिसीची कागदपत्रे नीट तपासा- तुमच्या पॉलिसीची कागदपत्रे आणि तुमचा जोडलेला वैद्यकीय अहवाल नीट तपासा. त्यामुळे सर्व अटी आणि तपशील योग्यरित्या नमूद केले जातील. हे नंतर बदलणे खूप कठीण आहे.
  • एक किंवा दोनपेक्षा जास्त पॉलिसी घेऊ नका- एक किंवा जास्तीत जास्त दोन पॉलिसी घेणे योग्य आहे. त्याहून अधिक तुमच्या इतर आर्थिक जबाबदाऱ्यांमध्ये अडथळा ठरू शकतात.
  • एखाद्या मजबूत विमा कंपनीचा ब्रँड निवडा - योग्य विमा कंपनी निवडणे तुम्हाला तुमच्या योजनेचा अधिकाधिक फायदा घेण्यास मदत करते. एक मजबूत, तपासलेला ब्रँड हा विश्वास ठेवण्यासारखा असतो.
  • कमी विमा संरक्षण घेऊ नका – १०-५० लाख रुपयांपर्यंत असलेले छोटे विमा संरक्षण दीर्घ मुदतीसाठी फारसे चांगले ठरत नाही; तुमच्या कुटुंबाला दीर्घ कालावधीसाठी मदत करू शकणार्‍या मोठ्या रकमेसाठी विमा उतरवणे चांगले ठरते.
  • तुमच्या टर्म प्लॅनबद्दल तुमच्या कुटुंबाला सांगा - तुमच्या कुटुंबाला विमा आणि एकूण पॉलिसीचा दावा कसा करायचा याबद्दल माहिती देणे अत्यावश्यक आहे.
  • कोणतीही आरोग्यविषयक/वैद्यकीय माहिती लपवू नका- तुमचे आरोग्य आणि वैद्यकीय परिस्थितींबद्दल तुमच्या विमा कंपनीशी पारदर्शकता ठेवणे महत्त्वाचे आहे. विमाकर्ता तुमच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल जितका स्पष्ट असेल तितका तुमचा आणि त्यांच्यामधला विश्वास अधिक चांगला राहतो.
  (हा लेख झेस्ट मनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक  लिझी चॅपमन यांनी लिहिला आहे.)
  First published:

  Tags: Insurance

  पुढील बातम्या