मराठी बातम्या /बातम्या /मनी /7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर, DA वाढणार! जाणून घ्या कधी किती वाढणार पगार

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर, DA वाढणार! जाणून घ्या कधी किती वाढणार पगार

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता 17 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातो. पुढे हा 11 टक्क्यांनी वाढून 28 टक्के होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता 17 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातो. पुढे हा 11 टक्क्यांनी वाढून 28 टक्के होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता 17 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातो. पुढे हा 11 टक्क्यांनी वाढून 28 टक्के होण्याची शक्यता आहे.

  नवी दिल्ली, 3 जून: केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी (central government employee ) गेल्या अनेक महिन्यांपासून महागाई भत्ता (DA) मिळण्याची वाट बघत आहेत. या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यासाठी अजून काही काळ वाट बघावी लागू शकते. नॅशनल काउंसिल ऑफ JCM ची अर्थ मंत्रालय (finance ministry) आणि पर्सनल अँड ट्रेनिंग डिपार्टमेंटच्या (DoPT) अधिकाऱ्यांसोबत मीटिंग होणार होती. मात्र ती मीटिंग काही कारणास्तव रद्द (meeting cancelled)  झाली आहे. ही मीटिंग मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात (last week of may) होणार होती.

  नॅशनल काउंसिल ऑफ JCM ने याबाबत माहिती देताना सांगितलं की, मीटिंग जून महिन्यात होईल. दिल्लीत कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आलंय, त्यामुळे ही मीटिंग मे महिन्यात होऊ शकली नाही. कोरोना महामारीमुळे (corona pandemic) केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) मिळण्यास वेळ लागत आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षाच्या सुरुवातीला थकीत महागाई भत्त्याच्या तीन इंस्टॉलमेंटवर या वर्षीच्या जून महिन्यापर्यंत बंदी घातली होती.

  जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मीटिंग होणार–

  JCMचे सेक्रेटरी शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितलं की, महागाई भत्त्यासंदर्भातील मीटिंग या महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होईल. या मीटिंगला उशीर झाल्याने ती होणार नाही, असं समजलं जाऊ नये, असंही मिश्रा म्हणाले. तसंच या मीटिंगच्या बाबतीत केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत चांगले संकेत मिळाले असल्याचंही त्यांनी सांगितलं.

  वेतन किती वाढणार?

  केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता 17 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातो. पुढे हा 11 टक्क्यांनी वाढून 28 टक्के होण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात (salary) मोठी वाढ होईल.

  कोरोनाने कर्मचाऱ्याचा मृत्यू रिलायन्स देणार 5 वर्ष पगार, मुलांचं शिक्षणही करणार

  तसेच कर्मचाऱ्यांना दोन वर्षांचा DAचा सोबत मिळणार आहे. कारण 2020च्या जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ झाली होती. त्यानंतर दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच 2020च्या जून महिन्यात त्यात 3 टक्क्यांची वाढ झाली होती. आता जानेवारी महिन्यात महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला होता. म्हणजेच महागाई भत्त्यातील सर्व वाढी मिळून तो आता 28 टक्के झाला आहे.

  6 कोटी नोकरदार वर्गासाठी मोदी सरकारचं गिफ्ट, PF खात्यात येणार अधिक पैसे

  नॅशनल काउंसिल ऑफ JCM ची अर्थ मंत्रालय (finance ministry) आणि पर्सनल अँड ट्रेनिंग डिपार्टमेंटच्या (DoPT) अधिकाऱ्यांसोबत मीटिंग यशस्वी झाल्यास केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच त्यांच्या वेतनात देखील मोठी वाढ होईल.

  First published: