• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • सर्वसामान्याच्या खिशाला कात्री: बटाटा-कांद्यानंतर खाद्यतेलाच्या किंमतीही वाढल्या

सर्वसामान्याच्या खिशाला कात्री: बटाटा-कांद्यानंतर खाद्यतेलाच्या किंमतीही वाढल्या

6 डिसेंबरपासून देशातील किरकोळ बाजारात खाद्यतेलांच्या किमतींमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. यामध्ये पाम तेलाचे दर 100 वरून 109 रुपये, सूर्यफूल तेल 123 वरून 127 रुपये आणि मोहरी तेल 133 रुपयांवरून 137 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 12 डिसेंबर: बाजारात बटाट्याची नवीन आवक झाल्याने बटाट्याची किंमत नियंत्रणात येऊ लागली आहे. गेल्या पाच दिवसांत बटाट्याचा दर 40 रुपयांवर आला आहे. त्याचबरोबर कांद्याचे दरही घटू लागले आहेत. तथापि, तेलाच्या किंमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील बजेट पुन्हा बिघडले आहे. सर्व खाद्य तेल, शेंगदाणा, मोहरी तेल, वनस्पती, सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम आदी तेलाच्या सरासरी किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. खाद्य तेलाचे वाढते दर सरकारसाठी चिंतेचे कारण बनत आहे. गेल्या 5 दिवसात तेलाच्या किंमती एवढ्या वाढल्या ग्राहक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दिलेल्या आकडेवारीनुसार, 6 डिसेंबरपासून देशातील किरकोळ बाजारात खाद्यतेलांच्या किमतींमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. यामध्ये पाम तेलाचे दर 100 वरून 109 रुपये, सूर्यफूल तेल 123 वरून 127 रुपये आणि मोहरी तेल 133 रुपयांवरून 137 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचले आहेत. पण शेंगदाणा तेलाच्या किंमती मात्र अडीच टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. (हे वाचा-मुलीच्या लग्नात 'हे' राज्य सरकार देणार सोनं, वाचा कुणाला आणि किती होईल फायदा) बटाटा-कांद्याच्या दरात घट या पाच दिवसात बटाट्याची सरासरी किंमत 42.88 रुपये होती, जी आता खाली येऊन 36.62 रुपये इतकी झाली आहे. त्याचवेळी कांद्याच्या दरातही घट झाली आहे. कांद्याचे दर 50 रुपयांवरून 44 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. टोमॅटोच्या दरात मात्र अजून वाढ होताना दिसत आहे. टोमॅटोच्या दरात 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तेलाच्या दरात का वाढ होत आहे? पाम तेल हे परदेशातून आयात केलं जातं, परंतु लॉकडाऊनमुळे मलेशियासारख्या देशांत या तेलाचं उत्पादन कमी झालं. शिवाय बियाण्याचे दरही वाढले. त्यामुळे शासन पातळीवर तेलाच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (हे वाचा-रेल्वेचे खाजगीकरण होऊन प्रवाशांना मिळणाऱ्या या सुविधा बंद होणार?) सप्टेंबरमध्येही तेलाच्या किंमती वाढल्या होत्या सप्टेंबरमध्ये पामोलिन तेल आणि सोयाबीन तेलाच्या किंमतीत सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाली होती. तर दुसरीकडे मोहरीचे तेल आणि सूर्यफूल तेलाच्या किंमती 30 ते 35 टक्क्यांनी वाढल्या होत्या. पाम तेलाची आयात शुल्क कमी करावे की नाही, याचा विचार सरकारने त्वरित केला पाहिजे. कारण पाम तेलाच्या किंमती वाढल्याने त्याचा परिणाम इतर खाद्यतेलांच्या किंमतींवर होतो.
  Published by:News18 Desk
  First published: