Home /News /money /

1 डिसेंबरपासून सर्व ट्रेन बंद होणार? जाणून घ्या रेल्वे मंत्रालयाने काय दिलं उत्तर

1 डिसेंबरपासून सर्व ट्रेन बंद होणार? जाणून घ्या रेल्वे मंत्रालयाने काय दिलं उत्तर

रेल्वे, कोविड-19 (COVID-19) स्पेशल ट्रेनसह, सर्व ट्रेन 1 डिसेंबरनंतर बंद करणार असल्याचा मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे. परंतु रेल्वे मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

    नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : तुम्हीही 1 डिसेंबरनंतर कुठे जाण्याचा विचार करताय का? रेल्वेचं रिजर्व्हेशन करून ठेवलंय का? जर असं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सध्या WhatsApp वर एक मेसेज व्हायरल होतोय, ज्यात 1 डिसेंबरपासून रेल्वे (Indian railways), कोविड-19 स्पेशल ट्रेनसह सर्वच ट्रेन रद्द करणार असल्याचं सांगितलं जातंय. परंतु हा मेसेज खोटा, फेक असल्याचं समोर आलं आहे. केंद्र सरकारी संस्था पीआयबीने या व्हायरल मेसेजच्या सत्यतेची पडताळणी केली असून याबाबत खुलासा केला आहे. रेल्वे, कोविड-19 (COVID-19) स्पेशल ट्रेनसह, सर्व ट्रेन 1 डिसेंबरनंतर बंद करणार असल्याचा मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे. परंतु रेल्वे मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सध्या सरकारची अशाप्रकारची कोणतीही योजना नसल्याचं सांगत रेल्वेने हा मेसेज संपूर्ण फेक असल्याचंही रेल्वेने म्हटलं आहे. 1 डिसेंबरनंतर ट्रेन सेवा बंद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, असं PIBFactCheck ने या व्हायरल मेसेजच्या सत्यता पडताळणीत म्हटलं आहे. कोरोना काळात देशभरात अनेक प्रकारचे फेक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशात केंद्र सरकारच्या प्रेस इंफॉर्मेशन ब्युरोने अनेक व्हायरल मेसेजची पडताळणी करत त्याची सत्यता सर्वांसमोर आणली आहे. अशाप्रकारच्या खोट्या बातम्या पसरू नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. जर तुम्हालाही कोणत्याही सरकारी योजना किंवा सरकारी योजनेच्या सत्यतेबाबत कोणताही संशय असल्यास, तुम्हीही ती माहिती पीआयबी फॅक्ट चेकसाठी पाठवू शकता. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा मेलद्वारे पीआयबी फॅक्ट चेकशी संपर्क करू शकता. व्हॉट्सऍपवरून 8799711259 संपर्क करू शकता. त्याशिवाय ट्विटरवर @PIBFactCheck फेसबुकवर PIBFactCheck आणि ईमेलद्वारे pibfactcheck@gmail.com ही संपर्क करू शकता. https://factcheck.pib.gov.in/ यावर अधिक माहिती घेऊ शकता.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Indian railway

    पुढील बातम्या