Home /News /money /

कुठल्या सरकारी कर्मचाऱ्यांना किती मिळणार बोनस? जाणून घ्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं

कुठल्या सरकारी कर्मचाऱ्यांना किती मिळणार बोनस? जाणून घ्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं

30 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस (Government Employee Bonus)मिळेल आणि तोही लवकरात लवकर असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी जाहीर केलं.

    नवी दिल्ली,  21 ऑक्टोबर : कॅबिनेट बैठकीत Cabinet Meeting Decision)मोदी सरकारने (Modi government)आज सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करून टाकणारा निर्णय घेतला. 30 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस (Government Employee Bonus)मिळेल आणि तोही लवकरात लवकर असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी जाहीर केलं. सरकारी कर्मचाऱ्यांना 3,737 कोटी रुपयांचा बोनस दसऱ्यापूर्वीच देण्यात येणार आहे, असंही सांगण्यात आलं. नेमका कुठल्या श्रेणीतल्या आणि कुठल्या सेवांमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा बोनस लागू आहे आणि किती पैसे अधिकचे मिळणार अशा सर्व प्रश्नांची उत्तरं.. कुठल्या विभागातल्या कर्मचाऱ्यांना बोनस? केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं की, व्यावसायिक सेवांमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या हिशोबाने 2,791 कोटी रुपयांचा बोनस मिळेल. आता या कमर्शिअल एस्टॅब्लिशमेंटमध्ये येणारे कर्मचारी म्हणजे भारतीय रेल्वे (Indian Railways), पोस्‍ट ऑफिस (Post Office), डिफेन्स प्रोडक्‍शन्स (Defence Production), ईपीएफओ (EPFO), एम्‍प्‍लॉइ स्‍टेट इन्शूरन्स कॉर्पोरेशन (ESIC)अशा सेवांमधल्या 17 लाख नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना 2,791 कोटींचा बोनस मिळेल त्यांनी केलेल्या कामाच्या हिशोबाने Productivity linked Incentive(PLI) दिला जाईल. याशिवाय केंद्र सरकारमध्ये काम करणाऱ्या 13 लाख कर्मचाऱ्यांना 906 कोटी रुपये नॉन-प्रोडक्टिविटी लिंक्‍ड (Non-PLI) बोनस दिला जाईल. कसा मिळेल बोनस? प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं की, केंद्र सरकारने घोषित केलेला दिवाळी बोनस कर्मचाऱ्यांच्या थेट बँक खात्यांमध्ये डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर (DBT)द्वारे जमा होईल. त्यामुळे सणासुदीच्या हंगामात त्यांच्याकडे रोख रकमेची चणचण जाणवणार नाही. मध्यमवर्गाला डोळ्यापुढे ठेवून सणाअगोदरच ही रक्कम बँक खात्यात वळती केली जाणार आहे. सरकारी तिजोरीवर किती ताण? मोदी सरकारने घोषित केलेल्या दिवाळी बोनसमुळे सरकारी तिजोरीवर 3,737 कोटींचं अतिरिक्त ओझं पडणार आहे. 30 लाखांहून अधिक नॉन गॅझेटेड सरकारी कर्मचाऱ्यांनाही रक्कम मिळणार आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Diwali, Government employees

    पुढील बातम्या