मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI-HDFC च्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा इशारा! 1 ऑक्टोबरपासून बंद होतील सेवा, पूर्ण करा हे काम

SBI-HDFC च्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा इशारा! 1 ऑक्टोबरपासून बंद होतील सेवा, पूर्ण करा हे काम

या बँकांनी आपल्या ग्राहकांना इशारा दिला आहे की या महिनाअखेरपर्यंत म्हणजे 30 सप्टेंबर 2021 पर्यंत तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक कर?

या बँकांनी आपल्या ग्राहकांना इशारा दिला आहे की या महिनाअखेरपर्यंत म्हणजे 30 सप्टेंबर 2021 पर्यंत तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक कर?

या बँकांनी आपल्या ग्राहकांना इशारा दिला आहे की या महिनाअखेरपर्यंत म्हणजे 30 सप्टेंबर 2021 पर्यंत तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक कर?

नवी दिल्ली, 02 सप्टेंबर: भारतातील सर्वांत मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक एचडीएफसी बँक (HDFC Bank) यामध्ये तुमचं खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. एचडीएफसी बँकेने ई-मेल पाठवून आपल्या ग्राहकांना इशारा दिला आहे की या महिनाअखेरपर्यंत म्हणजे 30 सप्टेंबर 2021 पर्यंत तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करून घ्या अन्यथा बँकिंग सेवा बाधित होऊ शकते.

एसबीआयचं विशेष आवाहन

स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) आपल्या 46 कोटी खातेदारांना (SBI account holder) विशेष आवाहन केलं आहे की लवकरात लवकर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक (PAN-Aadhaar card Link) करून घ्या. ठरलेल्या मुदतीपूर्वी जर तुम्ही हे लिंकिंग केलं नाहीत तर तुमच्या बँकिंग सेवांवर त्यांचा परिणाम होऊ शकतो.

HDFC ने देखील पाठवला मेल

एचडीएफसी बँकेनी ग्राहकांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटलंय की, तुम्ही जर आधार आणि पॅन कार्ड लिंक केलं नाहीत तर आम्हाला याची चिंता वाटते की तुम्ही 1 ऑक्टोबर 2021 पासून अनेक बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकणार नाही. त्याचबरोबर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय (Pan Card will get inactive) होईल. प्राप्तीकर नियम 1961 च्या कलम 139AA नुसार, प्रत्येक व्यक्तीने 30 सप्टेंबर 2021 पर्यंत आपलं आधार कार्ड पॅनकार्डासोबत लिंक करणं गरजेचं आहे.

हे वाचा-इंधन दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला चाप, मुंबईसह अनेक शहरात पेट्रोल शंभरीपार

SBI ने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे. तुम्ही जर तसं केलं नाहीत तर 30 सप्टेंबरनंतर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होईल. त्यामुळे निष्क्रिय झालेल्या पॅन कार्डाचा वापर तुम्ही कुठल्याही आर्थिक व्यवहारासाठी करू शकणार नाही.

30 सप्टेंबरपर्यंत आहे मुदत

आर्थिक व्यवहार नीट चालावेत तसंच हे व्यवहार करताना योग्य पद्धतीने ओळख पटवता यावी यासाठी सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करायला सांगितलं आहे. त्यामुळे ही दोन्ही कार्ड लिंक (PAN-Aadhaar linking) करणं अनिवार्य आहे. हे काम करण्यासाठी सध्या दिलेली मुदत 30 सप्टेंबर 2021 आहे. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक एसबीआयने आपल्या 46 कोटी ग्राहकांना याबाबत सूचना केली आहे. एसबीआयने म्हटलंय की जेवढं लवकरात लवकर पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करता येईल तेवढं लवकर ते करून घ्या.

हे वाचा-Gold Price Today: आज किती स्वस्त झालं सोनं? इथे जाणून घ्या लेटेस्ट दर

असं करा पॅन आणि आधार कार्ड लिंक

तुम्ही दोन पद्धतीने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करू शकता.

1- पहिला म्हणजे SMS आणि दुसरा इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ही कार्डं लिंक करू शकता.

2- जर तुम्हाला SMS च्या माध्यमातून लिंकिंग करायचं असेल तर रजिस्टर्ड मोबाईलवरून UIDPAN<स्पेस>12 अंकी आधार क्रमांक<स्पेस>10 अंकी पॅन क्रमांक 567678 किंवा 56161 या क्रमांकाला SMS करा. म्हणजे ही दोन्ही कार्डं लिंक केली जातील.

First published:

Tags: Hdfc bank, SBI, Sbi account