Home /News /money /

PF खातेधारकांसाठी अलर्ट! Google वर दिलेल्या या क्रमांकावर संपर्क केल्यास रिकामे होऊ शकते खाते

PF खातेधारकांसाठी अलर्ट! Google वर दिलेल्या या क्रमांकावर संपर्क केल्यास रिकामे होऊ शकते खाते

पीएफ खातेधारकांसाठी अत्यावश्यक बातमी आहे. तुम्ही पीएफ संदर्भातील कामासाठी गुगल सर्चवर देण्यात आलेल्या नंबरवर संपर्क केला आहे का? असल्याच वाचा नेमकं काय आहे प्रकरण

    मुंबई, 20 ऑक्टोबर : नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर पीएफ खातेधारक असाल तर ही बातमी वाचणे अत्यावश्यक आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे जाहीर सूचना जारी करत पीएफ खातेधारकांना अलर्ट राहण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये EPFO ने अशी सूचना दिली आहे की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना बांद्रा 1, 2, 3 आणि 4 समोर काही घटना आल्या आहेत. ईपीएफओ वांद्रे कार्यालयाचा जेव्हा संपर्क तपशील Google वर शोधला जातो, त्यावेळी कार्यलयाचे नाव, पत्ता कार्यालयीन वेळ इ. तपशील योग्य दिसतो आहे. मात्र यामध्ये एक मोबाइल क्रमांक दिसत आहे.  09102195592 असा क्रमांक गुगल सर्चमध्ये दिसत आहे. दरम्यान हा क्रमांक वापरणारा तोतया असल्याचे EPFO कडून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 09102195592 या नंबरशी कोणतेही व्यवहार करु नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अशी शंका व्यक्त केली जात आहे की, या क्रमांकावरून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली गेली आहे. शासनाकडून याबाबत सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (हे वाचा-पार्सल न मिळाल्याने मुंबईकर तरुणाने थेट Jeff Bezos ना केला मेल,लगेच मिळाला रिफंड) ईपीएफओ कडून जारी करण्यात आलेल्या सूचनेमध्ये असे म्हटले आहे की, Truecaller App वर हा क्रमांक कुणाचा आहे हे जेव्हा शोधले तेव्हा दीपक शर्मा या व्यक्तीच्या नावावर हा क्रमांक दिसत आहे. हा क्रमांक वापरणारी व्यक्ती युनिव्हर्सल अकाऊंट नंबरमधील (UAN) केवायसी स्टेटसचे अपग्रेडेशन, पीएफमधून पैसे काढणे इत्यादी प्रक्रियांकरता ईपीएफओ वर्गणीदार आणि सदस्यांकडून पॅन कार्ड (PAN Card), आधार कार्ड (Aadhar Card) आणि एटीएम कार्ड क्रमांकाची मागणी करत आहे. त्यामुळे ईपीएफओने असे म्हटले आहे की, EPFO कडून ईपीएफओ वर्गणीदार, निवृत्ती वेतनधारक आणि सदस्यांना अशाप्रकारे कोणतीही मागणी करत नाही. फोन किंवा ईमेलवरून EPFO अशा कोणत्याच कागदपत्रांसाठी मागणी करत नाही, हे पीएफ खातेधारकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. अन्यथा मोठ्या फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते. (हे वाचा-SBI अलर्ट! अजिबात करू नका या 5 चुका, अन्यथा तुमचे बँक खाते होईल रिकामे) ईपीएफओ वांद्रे ऑफिस संदर्भात येणाऱ्या तपशीलातील क्रमांक 09102195592 ज्याचा आहे, तो दीपक शर्मा तोतया असल्याचे या प्रसिद्धी सूचनेत सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यावर कोणताही संपर्क करू नये असेही या सूचनेत म्हटले आहे. या सूचनेद्वारे संबंधित व्यक्तीस ताकीद देखील देण्यात आली आहे. 09102195592 या क्रमांकावर कोणतेही वित्तीय ओळखपत्र न देण्याचे आवाहन EPFO कडून केले गेले आहे. याप्रकरणी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना बांद्रा 1, 2, 3 आणि 4  कडून बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये आणि निर्मलनगर पोलीस स्टेशनमध्ये वरीष्ठ पोलीस निरिक्षकांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सदर व्यक्तीचा तपास देखील सुरू आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money, Pf, PF Amount, Pf news, PF Withdrawal

    पुढील बातम्या