मराठी बातम्या /बातम्या /मनी /

LIC मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी Alert! 'या' कारणामुळे आहे तुमचे पैसे बुडण्याची भीती

LIC मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी Alert! 'या' कारणामुळे आहे तुमचे पैसे बुडण्याची भीती

LIC Alert: देशामध्ये ऑनलाइन फ्रॉड आणि सायबर क्राइमची प्रकरणं गेल्या काही दिवसांपासून वाढत आहेत. काही भामटे LIC अधिकारी, एजंट किंवा विमा नियामक आयआरडीएचे अधिकारी बनतात आणि ग्राहकांना कॉल करतात. यांच्या जाळ्यात अडकल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 24 एप्रिल:  देशामध्ये ऑनलाइन फ्रॉड (Online Fraud) आणि सायबर क्राइमची (Cyber Crime) प्रकरणं गेल्या काही दिवसांपासून वाढत आहेत. काही भामटे LIC अधिकारी, एजंट (Fake LIC Agent or officer) किंवा विमा नियामक आयआरडीएचे अधिकारी बनतात आणि ग्राहकांना कॉल करतात. यांच्या जाळ्यात अडकल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. या फसवणूक करणाऱ्यांकडून ग्राहकांना फोन केला जातो आणि त्यांना एखाद्या एलआयसी पॉलिसी (LIC Policy) बाबत माहिती तिचे फायदे वाढवून सांगितली जाते. त्यामुळे काहीवेळा ग्राहक त्यांची सध्याची पॉलिसी सरेंडर करण्यासाठी तयार होतात. जर तुम्हाला देखील असा कुणाचा फोन आला आहे तर तुम्ही तक्रार करू शकता.

LIC ग्राहकांची केली जातेय फसवणूक

हे भामटे ग्राहकांना एलआयसी पॉलिसी सरेंडर करायला सांगून चांगला रिटर्न देण्यासाठी ग्राहकांकडून मोठी फी वसूल करतात. तर काही प्रकरणांमध्ये ग्राहकांनी दिलेली रक्कम खोटी आश्वासने देऊन इतर ठिकाणी गुंतवली गेली आहे. अशा प्रकारे कंपनीचे प्रतिनिधी बनून पॉलिसीधारकांची दिशाभूल केली जात आहे.

(हे वाचा-Corona Period : बँकेत जाण्याची अजिबात गरज नाही; घरबसल्याच करा KYC अपडेट)

बनावट कॉलपासून राहा सावध

एलआयसीने जारी केलेल्या अलर्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, कंपनी कोणतीही पॉलिसी सरेंडर करण्याबाबत ग्राहकांना सूचवत नाही. कंपनीने ग्राहकांना या अशाप्रकारच्या नंबरवरून आलेले फोन अटेंड न करण्याचे आवाहन केले नाही. एलआयसीने ग्राहकांना सूचित केले आहे की त्यांनी एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर त्यांची पॉलिसी रजिस्टर करावी आणि त्याठिकाणी सर्व माहिती घ्यावी.

(हे वाचा-गुंतवणूक करण्याचा विचार करताय? आयडीबीआय बँकेची ही योजना आहे पर्याय)

लक्षात ठेवा या गोष्टी

-अशाच एजंटकडून पॉलिसी खरेदी करा ज्याच्याकडे आयआरडीए द्वारे जारी करण्यात आलेला परवाना आहे किंवा एलआयसीने दिलेले ओळखपत्र (ID) आहे

-जर तुम्हाला कोणताही दिशाभूल करणारा कॉल आला तर  co_crm_fb@licindia यावर तक्रार करू शकता.

-एलआयसीच्या वेबसाइटवर जाऊन तक्रार निवारण अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा पर्याय ग्राहकांकडे आहे.

First published:

Tags: Cyber crime, Insurance, LIC, Money, Online fraud, Policy plans, Security alert