Home /News /money /

Alert! तुमचं डेबिट-क्रेडिट कार्ड सुरक्षित आहे का? 3.3 लाख Card Data चा डार्क वेबवर लिलाव

Alert! तुमचं डेबिट-क्रेडिट कार्ड सुरक्षित आहे का? 3.3 लाख Card Data चा डार्क वेबवर लिलाव

एका ऑनलाइन गिफ्ट कार्ड पोर्टलकडून (Online Gift Card Portal) त्यांच्याकडे असलेला डेटा डार्क वेबला (Dark Web) विकला गेला असल्याचं समजलं आहे.

नवी दिल्ली, 10 एप्रिल: अलीकडच्या काळात डेटा सिक्युरिटीचा प्रश्न अगदीच गंभीर बनला आहे. डेटा चोरीला गेल्याची एकामागून एक प्रकरणं समोर येत आहेत. दरम्यान एका ऑनलाइन गिफ्ट कार्ड पोर्टलकडून (Online Gift Card Portal)  त्यांच्याकडे असलेला डेटा डार्क वेबला (Dark Web) विकला गेला असल्याचं समजलं आहे. त्या डेटामध्ये 3.3लाख क्रेडिट (Credit Cards) आणि डेबिट कार्ड्सच्या (Debit Cards) माहितीसह 285 कोटी रुपयांच्या गिफ्ट कार्ड्सच्या माहितीचाही समावेश आहे. जेमिनी अॅडव्हायजरी (Gemini Advisory) या सायबर सिक्युरिटी फर्मने (Cyber Security Firm) याबद्दलची माहिती दिली आहे. रशियातल्या एकाप्रसिद्ध डार्क वेब हॅकर फोरमवर या डेटाचा लिलाव होताना पाहिलं असल्याचा दावा जेमिनी अॅडव्हायजरीने केला आहे. या डेटाचा लिलाव पूर्ण झाल्याचं वृत्त असून, त्याचं मूल्य जवळपास 300कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. या ब्रँडचे गिफ्ट कार्ड अॅमेझॉन, एअर बीएनबी, मॅरियट, नाइक, वॉलमार्ट अशा नामवंत ब्रँड्सच्या गिफ्टकार्ड्ससह अन्य अनेक ब्रँड्सच्या गिफ्ट कार्ड्सचा या डेटामध्ये समावेश आहे. हॅकर्सनी (Hackers) या चोरीच्या गिफ्ट कार्डची लिलावातली किंमत 10 हजार डॉलर होती असून, थेट खरेदी करायची असल्यास 15 हजार डॉलर म्हणजेच सुमारे 11 लाख रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. (हे वाचा-Facebook Data Leak नेमकं काय आहे प्रकरण; कसं सुरक्षित ठेवाल तुमचं FB अकाउंट) जेमिनी अॅडव्हायजरीने दिलेल्या माहिती नुसार, चोरी करण्यात आलेल्या 3.3 लाख क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सचे डिटेल्स हॅकर्सकडून 15 हजार डॉलरला विकण्यात आले आहेत. बहुतांश सायबर गुन्हेगार (Cyber Criminals) अशा कार्ड्समधून लवकरात लवकर पैसे काढून घेतात, जेणेकरून कंपन्यांकडून कार्ड्स बंद होण्याच्या आत त्यांचा हेतू सफल होऊ शकेल. गिफ्ट कार्ड्स, तसंच क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स अशा दोन्हींचा हा डेटाबेस (Database) एका नामवंत गिफ्ट कार्ड ऑक्शन प्लॅटफॉर्म कार्ड पूलवरून घेण्यात आला आहे, असं समजतं. कोविड काळात बंद पडलेला हा प्लॅटफॉर्म अमेरिकेत विशेष लोकप्रिय होता. (हे वाचा-तुमच्या मुलांचा 5 वा बर्थडे सेलिब्रेट केलात; आता त्यांचं Aadhaar Card अपडेट करा) तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार,अशा प्रकारचा डेटा डार्क वेबवर बिटकॉइन (Bitcoin)या क्रिप्टोकरन्सीद्वारे अघोषित किमतीला विकला जात आहे. या डेटासाठी हॅकर्स टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क साधत आहेत. युझर्सचा डेटा स्टोअर करण्यासाठी पेमेंट कार्ड इंडस्ट्री डाटा सिक्युरिटी स्टँडर्डचा (PCIDSS) वापर करते. हॅकर कार्ड फिंगरप्रिंट बनवण्यासाठी हॅश अल्गोरिदमचा (Hash Algorithm) वापर करू शकतात,तर ते मास्क्ड कार्डनंबरही डिक्रिप्ट (Decrypt) करू शकतात. अशा परिस्थितीत सगळ्याच कार्डधारकांची खाती धोक्यात येऊ शकतात,असं तज्ज्ञ म्हणतात.
First published:

Tags: Internet, Online fraud

पुढील बातम्या