अक्षय तृतीयेनिमित्त 'इथून' खरेदी करा सोन्याचे दागिने, मिळेल 'मोठं' डिस्काउंट

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर या सवलतीचा लाभ घ्या.

News18 Lokmat | Updated On: May 7, 2019 12:23 PM IST

अक्षय तृतीयेनिमित्त 'इथून' खरेदी करा सोन्याचे दागिने, मिळेल 'मोठं' डिस्काउंट

मुंबई, 07 मे : अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. पण कामाच्या व्यापात मनात असूनही दागिन्यांच्या दुकानात जायला वेळ मिळत नाही. अशात आॅनलाइन शाॅपिंग हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही आज ( 7 मे ) अक्षय तृतीयेला घरातून बाहेर न जाता सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतोय काही आॅनलाइनच्या आॅफर्स. अक्षय तृतीयेला फ्लिपकार्ट आणि अमेझाॅनवर चांगल्या आॅफर्स मिळतायत.

फ्लिपकार्ट आॅफर

अक्षय तृतीयेच्या निमित्तानं तुमचा आवडता ब्रँड फ्लिपकार्टवर सगळ्या मोठ्या ब्रँडवर 30 टक्के सूट मिळणार आहे. मालाबार, कल्याण ज्वेलर्स, PC ज्वेलर्स, TBZ आणि सेंको या मोठ्या ब्रँडवर डिस्काउंट मिळतोय.

या ठिकाणच्या 300 मतदान केंद्रांवर पडलं नाही एकही मत

तुम्ही चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने घेऊ इच्छिताय, तर तुम्हाला 30 ते 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळतोय.

Loading...

ई काॅमर्सची ही मोठी कंपनी सोनं आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेसमध्ये 100 टक्के सूट देतेय.

SBI कार्ड आणि अमेझाॅनवरून खरेदी केलं तर जास्त डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळतो.

सोन्याची चेन तुम्ही खरेदी केली तर मेकिंग चार्जेसवर 50 टक्के सूट मिळेल.

सोन्या-चांदीच्या नाण्यांवर 20 टक्के डिस्काउंट मिळेल.

साध्वी प्रज्ञांना जिंकवण्यासाठी BJPनं आखली 'ही' मोठी योजना

मालाबार ज्वेलर्स आॅफर

मालाबार ज्वेलर्सकडून तुम्ही 15 हजार रुपयांचं शाॅपिंग केलं तर तुम्हाला एक सोन्याचं नाणं मोफत मिळेल. सोबत प्रत्येक खरेदीवर तुम्हाला गिफ्ट कार्डही मिळेल. त्याचा उपयोग तुम्ही पुढच्या खरेदीवर करू शकता.

तेव्हा तुम्ही अक्षय तृतीयेला बाजारात न जाता फोनवरून हवं ते मागवू शकता.

चर्चा तर होणारच ! सानिया मिर्झानं मुलाचा क्युट फोटो केला शेअर

SBI ची आॅफर

स्टेट बँक आॅफ इंडियानं सोनं खरेदी करण्यासाठी बंपर सूटबरोबर कॅशबॅकची आॅफरही दिलीय. SBI च्या वेबसाइटवरच्या माहितीनुसार सोनं खरेदी केल्यावर 5 टक्क्यापर्यंत सवलत मिळते. ही सूट जास्तीत जास्त 2500 रुपये आहे. याचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना कमीत कमी 25 हजार रुपयांची खरेदी करावी लागेल. कॅशबॅकची सूट दुकानदारांकडून मिळणाऱ्या सवलतीहून वेगळी असेल.


VIDEO: अक्षय तृतीयेनिमित्त गणरायाला 21 शे आंब्याची आरास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2019 12:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...