News18 Lokmat

Airtel ची जबरदस्त ऑफर, मोफत 4G हाॅटस्पाॅटसह 'हे' आहेत प्लॅन्स

एअरटेलनं आपल्या जुन्या ग्राहकांसाठी आणि नवे ग्राहक जोडले गेले पाहिजेत यासाठी अ‍ॅडव्हान्स रेंटल प्लॅन सुरू केलाय. शिवाय कंपनीनं हाॅटस्पाॅट प्लॅन रिव्हाइज केलाय.

News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2019 01:26 PM IST

Airtel ची जबरदस्त ऑफर, मोफत 4G हाॅटस्पाॅटसह 'हे' आहेत प्लॅन्स

मुंबई, 03 एप्रिल : एअरटेलनं आपल्या जुन्या ग्राहकांसाठी आणि नवे ग्राहक जोडले गेले पाहिजेत यासाठी  अ‍ॅडव्हान्स रेंटल प्लॅन सुरू केलाय. शिवाय कंपनीनं हाॅटस्पाॅट प्लॅन रिव्हाइज केलाय. टेलिकाॅम टाॅकच्या रिपोर्टनुसार आता कंपनी पहिल्या किमतीत 500 टक्के जास्त डेटा देतेय. याशिवाय एअरटेल मोफत 4G हाॅटस्पाॅटही देतेय. पाहूया कोणाला याचा फायदा मिळू शकतो.

या युजर्सना मिळणार 4G हाॅटस्पाॅट

कुठलाही युजर 6 महिन्यांपेक्षा जास्त अ‍ॅडव्हान्स रेंटल प्लॅन निवडू शकतो, त्याला जास्त रक्कम न आकारता मोफत हाॅटस्पाॅट दिला जाईल. याशिवाय कंपनी 399 रुपये आणि 599 रुपयांचा टॅरिफ प्लॅनची सुरुवात करू शकतात.

एअरटेलच्या 4G हाॅटस्पाॅटचा मंथली प्लॅन

एअरटेल हाॅटस्पाॅटच्या प्लॅन्सबद्दल बोलायचं झालं तर यात दोन टॅरिफ प्लॅन्स मिळतात. त्याची किंमत 399 रुपये आणि 599 रुपये आहे. 399 रुपयांमध्ये एक महिन्यासाठी 50 GB डेटा आणि त्यानंतर 80Kbps च्या स्पीडवर अनलिमिटेड थ्राॅटलिंग मिळते. 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला 100 GB डेटा मिळतो. त्याची व्हॅलिडिटी 1 महिन्याची असते.

Loading...

हा आहे अ‍ॅडव्हान्स रेंटल प्लॅन

कंपनी नाॅर्मल प्लॅनशिवाय सहा महिन्यांचा अ‍ॅडव्हान्स प्लॅन्स देतेय. हा प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना 4G हाॅटस्पाॅट डिव्हाइस फ्री मिळणार. तुम्ही 399 रुपयांचा प्लॅन 6 महिन्यांसाठी निवडला असाल, तर तुम्हाला 2,400 रुपये द्यावे लागणार. 599 रुपयांच्या प्लॅनला 6 महिन्यांसाठी निवडण्यासाठी युजरला 3,600 रुपये द्यावे लागतील. या दोन्ही प्लॅन्ससोबत युजर्सना 4G हाॅटस्पाॅट डिव्हाइस मोफत दिलं जाईल.

मध्यंतरी जिओनं नव्या प्लॅनची घोषणा केली होती. त्यानंतर सर्व कंपन्या सरसावल्या आणि त्यांनी मोबाइल फोनचे नवनवे प्लॅन्स बाजारात आणलेत. त्यामुळे फायदा ग्राहकांचाच होतोय.


VIDEO: परेश रावल म्हणाले..'मोदींना पाठिंबा देण्यासाठी खासदारकीची गरज नाही'बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 3, 2019 01:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...