विमानाचा प्रवास आणखी महागणार

विमानाचा प्रवास आणखी महागणार

उन्हाळ्याच्या सुट्या आता संपत आल्या आहेत पण अजूनही तुमचा विमानाने कुठे जाण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. विमान प्रवास आणखी महागणार आहे. त्यामुळे विमानाचं तिकीट काढण्यासाठी जादा आर्थिक तरतूद करावी लागणार आहे.

  • Share this:

मुंबई, 8 जून : उन्हाळ्याच्या सुट्या आता संपत आल्या आहेत पण अजूनही तुमचा विमानाने कुठे जाण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. विमान प्रवास आणखी महागणार आहे त्यामुळे विमानाचं तिकीट काढण्यासाठी जादा आर्थिक तरतूद करावी लागणार आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाने एव्हिएशन सिक्युरिटी फी मध्ये वाढ केली आहे. ही फी 130 रुपयांवरून 150 रुपयांवर आणण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी जादा पैसे

आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांसाठी आता ही फी 225 रुपयांवरून 336 रुपयांवर गेली आहे. पुढच्या महिन्यापासून म्हणजे जुलैपासून ही फीवाढ होणार आहे. 1 जुलैपासूनच ही फीवाढ तुमच्या विमानाच्या तिकिटामध्ये जमा होईल.

प्रमुख हवाई मार्गांचा प्रवास महागला

याआधी जेट एअरवेजवर ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे प्रवाशांना अन्य विमान कंपन्यांकडे मोर्चा वळवावा लागला होता. यामुळे देशातल्या सगळ्या प्रमुख हवाई मार्गांवरचं भाडं वाढलं होतं. याचा परिणाम उन्हाळी सुट्टीमध्ये फिरायला जाणाऱ्या पर्यटकांवर चांगला झाला. मुंबई- दिल्ली, मुंबई- बंगळुरू, मुंबई-कोलकाता आणि चेन्नई सारख्या मार्गांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बराच भुर्दंड बसला होता.

जुलैपासून प्रवास महाग

जून महिन्यात विमानप्रवास करायचा असेल तर तो थोडा स्वस्त पडतो, असं म्हणतात. पण या सुट्यांच्या हंगामात विमानांच्या तिकिटांच्या किंमती वाढलेल्याच होत्या. आता एव्हिएशन सिक्युरिटी फी म्हणजेच विमान प्रवासातल्या सुरक्षेसाठीची फी वाढवण्यात आल्यामुळे प्रवाशांना जुलैमधला विमान प्रवास महाग पडणार आहे.

==============================================================================================

VIDEO : अस्वलाची शिकार अन् 'टायगर की चाल पर संदेह नही करते'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2019 08:57 PM IST

ताज्या बातम्या