Home /News /money /

Air India Recruitment : 'या' पदांसाठी 100 जागा, पगार 45 हजार रुपये

Air India Recruitment : 'या' पदांसाठी 100 जागा, पगार 45 हजार रुपये

तुम्हाला सरकारी विमानसेवा एअर इंडियामध्ये काम करायचं असेल, तर मोठी संधी आहे. तुम्ही सरळ इंटरव्ह्यू देऊ शकता.

    मुंबई, 07 मे : तुम्हाला सरकारी विमानसेवा एअर इंडियामध्ये काम करायचं असेल, तर मोठी संधी आहे. तुम्ही सरळ इंटरव्ह्यू देऊ शकता. एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्विस लिमिटेड ड्युटी मॅनेजर आणि कस्टमर एजंट या पदांवर भरती होणार आहे. या पदांसाठी उमेदवाराला परीक्षा द्यावी लागणार नाही. तुम्ही सरळ इंटरव्ह्यूला जाऊ शकता. ही भरती मुंबई एअरपोर्टसाठी आहे. त्यासाठी 13 मे आणि 14 मे रोजी इंटरव्ह्यू होईल. या पदांसाठी महत्त्वाच्या गोष्टी एअर इंडिया ड्युटी मॅनेजर टर्मिनल पदासाठी 9 आणि कस्टमर एजंटसाठी 100 पदांची भरती करायचं ठरवलंय. ड्युटी मॅनेजर टर्मिनलचा पगर 45 हजार रुपये आणि कस्टमर एजंटचा पगार 20,190 रुपये असेल. खुशखबर, अक्षय तृतीयेला स्वस्त झालं सोनं, 'हे' आहेत नवे भाव ही नोकरी परमनन्ट एम्पलाॅयी म्हणून नाही. ती काॅन्ट्रॅक्टवर आहे. यात तीन वर्षांचं काॅन्ट्रॅक्ट असेल. तुमच्या कामावरच काॅन्ट्रॅक्ट वाढवायचं की नाही ते ठरेल. धोनीला धमकी! झिवाचं अपहरण होईल, काळजी घे ड्युटी मॅनेजर टर्मिनलचं वय 55 वर्षांपेक्षा जास्त नसावं. तर कस्टमर एजंटसाठी वेगवेगळ्या वर्गासाठी वेगवेगळी  वयोमर्यादा आहे. या पदांसाठी सामान्य वर्गात 28 वर्ष, ओबीसीसाठी 32 वर्ष, SC, STसाठी 33 वर्ष वयोमर्यादा ठेवलीय. 1 रुपयात खरेदी करा 24 कॅरेट सोनं, 'ही' आहे नवी योजना ड्युटी मॅनेजर टर्मिनल या पदासाठी इंटरव्ह्यू 13 मे रोजी सकाळी 9 पासून 12 वाजेपर्यंत होईल. कस्टमर एजंटसाठी 14मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत इंटरव्ह्यू होईल. या मुलाखती मुंबई एअरपोर्ट गेट नंबर 5च्या जीएसडी काॅम्पेलेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर सिस्टिम अँड ट्रेनिंग डिव्हिजनमध्ये होतील. VIDEO : तुला फिरवीन गाडीवर, वरातीत तब्बल 63 नवरदेवांचा साॅलिड डान्स
    First published:

    Tags: Air india

    पुढील बातम्या