एअर इंडियात केबिन क्रूसाठी व्हेकन्सी, 'अशी' होईल निवड

एअर इंडियात केबिन क्रूसाठी व्हेकन्सी, 'अशी' होईल निवड

Air India Express Recruitment 2019 : एअर इंडिया एक्स्प्रेस लिमिटेड ( एआयईएल ) नं केबिन क्रूसाठी व्हेकन्सी काढल्या आहेत. यात 51 पदांवर भरती केली जाईल.

  • Share this:

मुंबई, 04 जुलै : एअर इंडिया एक्स्प्रेस लिमिटेड ( एआयईएल ) नं केबिन क्रूसाठी व्हेकन्सी काढल्या आहेत. यात 51 पदांवर भरती केली जाईल. या पदांवर महिलांचीच भरती केली जाईल. उमेदवाराची निवड इंटरव्ह्यूनं होईल. शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण हवी.

एअर इंडियानं दिलेल्या माहितीनुसार निवड झालेल्या उमेदवाराला 10 हजार स्टायपेंड दिलं जाईल. उमेदवाराचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला 36, 630 रुपये दिले जातील. पगार 18,630 रुपये आहे. पण 60 तास प्रवास केल्यानंतर उड्डाण भत्ता 18 हजार रुपये असेल. airindiaexpress.in  या साइटवर जाऊन अर्ज डाउनलोड करा.

बँकेत 12 हजार पदांवर मागवलेत अर्ज, आज आहे शेवटची तारीख

या दिवशी होईल इंटरव्ह्यू

केबिन क्रूसाठी 9 जुलैला इंटरव्ह्यू ठेवलेत. इंटरव्ह्यूची वेळ सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आहे.

पोस्टाच्या 'या' 9 सेव्हिंग स्कीम, यातली गुंतवणूक आहे फायदेशीर

वयोमर्यादा

1 जुलै 2019 रोजी जास्तीत जास्त वय 27 वर्ष हवं. अनुसूचित जाती, जनजातींसाठी 5 वर्षांची सवलत आहे. . इतर मागासवर्गासाठी 3 वर्षांची सूट आहे.

भारतीय रुपया 'या' मुस्लीम देशातही चालणार

वैवाहिक स्थिती

अविवाहित

उंची/ बीएमआय

157.5 सेंटीमीटर/बीएमआई-18-22

तरुणींना चांगल्या करियरची संधी आहे. ज्यांना फिरायची आवड आहे त्यांच्यासाठी हे उत्तम करियर आहे.

तसंच, एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेडमध्ये 248 जागांची भरती आहे. कस्टमर एजेंट, ड्युटी मॅनेजर -टर्मिनल,ड्युटी ऑफिसर, ज्युनिअर एक्झिक्युटिव (HR/Administration), असिस्टंट (HR/Administration), डेटा अनॅलिस्ट, हॅंडिमन, ऑफिसर (HR/Administration), ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (HR/Administration) या पदांसाठी अर्ज मागवलेत.

कस्टमर एजंट या पदासाठी  पदवीधर आणि  IATA -UFTA / IATA -FIATAA / IATA -DGR / IATA -CARGO डिप्लोमा किंवा अनुभव हवा.

ड्युटी मॅनेजर टर्मिनलसाठी पदवीधर आणि  16 वर्ष अनुभव हवा.

ड्युटी आॅफिसर पदासाठी  पदवीधर आणि IATA -UFTA / IATA -FIATAA / IATA -DGR / IATA -CARGO डिप्लोमा , 10 वर्ष अनुभव हवा.

ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (HR/Administration) या पदासाठी MBA, 1 वर्ष अनुभव  किंवा पदवीधर आणि 5 वर्ष अनुभव हवा.

असिस्टंटसाठी पदवीधर आणि 2 वर्ष अनुभव हवा.

VIDEO : कोरडंठाक ! मराठवाड्याकडे पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत

First published: July 4, 2019, 8:42 PM IST
Tags: air india

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading