Air India फ्लॅट, प्रॉपर्टी विकणार! 13.3 लाखात या 10 शहरांमध्ये मालमत्ता खरेदी करण्याची संधी

Air India फ्लॅट, प्रॉपर्टी विकणार! 13.3 लाखात या 10 शहरांमध्ये मालमत्ता खरेदी करण्याची संधी

एअर इंडियाने या माध्यमातून 250 ते 300 कोटी रुपये उभे करण्याची योजना आखली आहे. ही मालमत्ता देशाच्या 10 मोठ्या शहरांमध्ये निवासी ठिकाणी आहे. महाराष्ट्रातीलही काही शहरांचा यात समावेश आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 जून : कर्जबाजारी विमान कंपनी एअर इंडिया (Air India) आता पैसे गोळा करण्यासाठी देशातील अनेक शहरांमध्ये आपले फ्लॅट आणि इतर मालमत्ता (यात निवासी, व्यावसायिक आणि भूखंडांचा समावेश आहे) विक्री करण्याची योजना आखत आहे. एअर इंडियाने या माध्यमातून 250 ते 300 कोटी रुपये उभे करण्याची योजना आखली आहे. ही मालमत्ता देशाच्या 10 मोठ्या शहरांमध्ये निवासी ठिकाणी आहे. महाराष्ट्रातीलही काही शहरांचा यात समावेश आहे. 18 जून रोजी राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार यासाठी ई-लिलाव (Online auction) घेण्यात येणार आहे. हा लिलाव 8 जुलै 2021 पासून सुरू होईल आणि 9 जुलै 2021 रोजी बंद होईल.

13.3 लाख रुपयांपासून सुरू होणार बोली

मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, या युनिटची प्रारंभिक बोली 13.3 लाख रुपयांपासून सुरू होते. ग्राहकांना जास्तीत-जास्त दीडशे कोटी रुपयांची बोली लावता येणार आहे. या लिलावाच्या स्लॉटमध्ये बर्‍याच मालमत्ता अशा आहेत, ज्या यापूर्वी अनेकदा विक्रीसाठी ठेवल्या गेल्या आहेत.

या शहरांमध्ये मालमत्ता

एअर इंडियाने जारी केलेल्या नोटीसनुसार मुंबईत एक निवासी प्लॉट आणि फ्लॅट, नवी दिल्लीत पाच फ्लॅट, बंगळुरूमध्ये एक निवासी प्लॉट आणि कोलकाता येथे चार फ्लॅट आहेत. कंपनी या सर्व मालमत्तांची विक्री करणार आहे. त्याचप्रमाणे औरंगाबादमध्ये बुकिंग ऑफिस आणि स्टाफ क्वार्टर, नाशिकमध्ये फ्लॅट, नागपुरात बुकिंग कार्यालय, एअरलाइन्स हाऊस आणि भूजमधील एक निवासी भूखंड आणि तिरुअनंतपूरममध्ये एक निवासी प्लॉट आणि मंगरुरू येथे दोन फ्लॅट आहेत.

हे वाचा - जगातील सर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच होते महिलांसोबत छेडछाड

10 टक्केपर्यंत सूट

एअर इंडियाने खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी यातील काही मालमत्तांमध्ये विशेषत: टायर 1 शहरांमध्ये राखीव किंमत कमी केली आहे. म्हणजेच टायर 1 शहरांमध्ये एअरलाइन्स कंपनी प्रॉपर्टी खरेदीवर विशेष सवलत देईल. एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार या मालमत्तांमध्ये खरेदीदारांना सुमारे 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

Published by: News18 Desk
First published: June 19, 2021, 4:27 PM IST

ताज्या बातम्या