एअर इंडियात नोकरीची मोठी संधी, 335 जागांवर होतेय भरती

Air India, Jobs - एअर इंडियामध्ये अनेक पदांवर व्हेकन्सीज आहेत. जाणून घ्या त्याबद्दल

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 09:00 PM IST

एअर इंडियात नोकरीची मोठी संधी, 335 जागांवर होतेय भरती

मुंबई, 19 जुलै : एअर इंडियात नोकरीची मोठी संधी आहे. एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये 335 जागांसाठी भरती आहे. ड्युटी ऑफिसर-टर्मिनल, ड्युटी ऑफिसर, ऑफिसर (IR/HR), ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (HR/एडमिन), ज्युनिअर एक्झिक्युटिव (Pax), ऑफिसर- अकाउंट्स, डेप्युटी टर्मिनल मॅनेजर (Pax Handling), ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (टेक्निकल), ड्युटी मॅनेजर-टर्मिनल, कस्टमर एजंट, रॅम्प सर्विस एजंट, युटिलिटी एजंट-कम-रॅम्प ड्राइव्हर, हँडिमन/ हँडिवुमन या पदांसाठी व्हेकन्सी आहेत. एकूण 335 जागांवर भरती करायची आहे.

पदं आणि पदसंख्या

ड्युटी ऑफिसर-टर्मिनल- 8

ड्युटी ऑफिसर- 15

ऑफिसर (IR/HR) - 2

Loading...

ज्युनिअर एक्झिक्युटिव (HR/एडमिन) - 4

ज्युनिअर एक्झिक्युटिव (Pax)-   65

ऑफिसर- अकाउंट्स - 1

डेप्युटी टर्मिनल मॅनेजर (Pax Handling) - 2

ज्युनिअर एक्झिक्युटिव (टेक्निकल) - 2

ड्युटी मॅनेजर-टर्मिनल - 4

कस्टमर एजेंट - 56

रॅम्प सर्विस एजेंट - 15

युटिलिटी एजंट-कम-रॅम्प ड्राइव्हर -   40

हँडिमन/ हँडिवुमन - 121

1 लाख रुपयांमध्ये सुरू करा हा व्यवसाय, दर महिन्याला कमवा 15 हजार रुपये

वयाची अट

प्रत्येक पदासाठी वेगवेगळा वयोगट हवा आहे. एकूण 28 वर्ष ते 55 वर्षापर्यंत ही संधी आहे. 1 जुलै 2019ला ही वयोमर्यादा हवी. आरक्षित उमेदवारांना नियमाप्रमाणे सूट मिळेल.

अर्जाची फी सामान्य आणि ओबीसींना 500 रुपये . तर मागासवर्गीयांना फी नाही.

सोन्या-चांदीच्या भावात झाले मोठे बदल, 'हे' आहेत नवे दर

उमेदवाराची थेट मुलाखत होईल. 29,30,31 जुलै 2019, आणि   01, 02, 04, 05,07 ऑगस्ट 2019  (वेळ: सकाळी 9 ते 12) या दिवशी आहे.

अधिक माहितीसाठी http://www.airindia.in/ या लिंकवर क्लिक करा.

दरम्यान,मोदी सरकारच्या 100 दिवसांच्या अजेंड्यांमध्ये नोकऱ्या आणि रोजगार वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. नीती आयोग आता नव्या सरकारसाठी आर्थिक अजेंडा बनवणार आहे. यामध्ये देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात येणार आहेत.

या आर्थिक अजेंड्यामध्ये खाजगी क्षेत्रातली गुंतवणूक, शेती उत्पादन वाढवण्यावर भर आणि रोजगार वाढवण्यासाठीच्या कार्यक्रमाचा समावेश आहे. विरोधकांनी या निवडणुकीत रोजगार कमी झाल्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला धारेवर धरलं होतं पण लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर या मुद्द्यावरून जनतेने सरकारला नाकारलेलं नाही हेच लक्षात येतं.

कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यासाठी सरकार खाजगी शिक्षण संस्थांना कर्ज देणार आहे. त्याशिवाय खाजगी कंपन्यांना सवलती देण्याचाही सरकार विचार करत आहे. स्किल इंडियासाठी सरकारने 3400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. आता हा निधी आणखी वाढवण्यात येईल.

SPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांना अंधारात नेमके कोणते आमदार भेटतात?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobs
First Published: Jul 19, 2019 09:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...