Home /News /money /

खूशखबर! Air Asia लवकरच सुरू करणार फ्लाईंग टॅक्सी सुविधा; जाणून घ्या वैशिष्ट्ये

खूशखबर! Air Asia लवकरच सुरू करणार फ्लाईंग टॅक्सी सुविधा; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Air Asia Flying Taxi: मलेशियाची (Malaysia Airline) प्रमुख विमान कंपनी एअर एशिया (Air Asia) लवकरच फ्लाईंग टॅक्सीची (Flying Taxi) सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या तयारीला लागली आहे.

    नवी दिल्ली, 06 मार्च: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर जगभरातील विविध देशांत लॉकडाऊन जारी करण्यात आलं होतं. कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेननंतर पुन्हा विमानसेवेवर निर्बंध लादण्यात आले आहे. याचा आर्थिक फटका जगभरातील अनेक विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना बसला आहे. अशातच मलेशियाची (Malaysia Airline) प्रमुख विमान कंपनी एअर एशिया (Air Asia) लवकरच फ्लाईंग टॅक्सीची (Flying Taxi) सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या तयारीला लागली आहे. एअर एशिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह संस्थापक टोनी फर्नांडिस यांनी शनिवारी सांगितलं की, "आम्ही सध्या फ्लाईंग टॅक्सीची सुविधा आणण्यावर काम करत आहोत आणि ही सुविधा लवकरच आपल्या सेवेत येणार आहे. साधारणतः पुढील दीड वर्षाच्या आत या सुविधाचा तुम्ही लाभ घेवू शकता.' युथ इकॉनॉमिक फोरमद्वारे आयोजित केलेल्या एका ऑनलाईन चर्चेमध्ये फर्नांडिस यांनी हा खुलासा केला आहे. कंपनीने सुपर अ‍ॅप लाँच केला कोरोनो विषाणूच्या साथीने विमानसेवा व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे. दरम्यानच्या काळात एअर एशियाने डिजिटल स्पेसमध्ये लक्षणीय विस्तार केला आहे. गतवर्षी कंपनीने एक सुपर अ‍ॅप बाजारात आणलं होतं. या अॅपद्वारे कंपनीने ग्राहकांना प्रवास, शॉपिंगपासून विविध आर्थिक सेवा प्रदान केल्या आहेत. फर्नांडिस यांनी सांगितलं की, आपला व्यवसाय परत प्रगतीपथावर आणण्यासाठी या नवीन सुविधेकडे एक संधी म्हणून पाहिलं जात आहे. अशी असेल फ्लाईंग टॅक्सी फर्नांडिस म्हणाले की, एअर एशिया एप्रिलमध्ये स्वतःची ई-हेलिंग सेवा सुरू करण्याची अपेक्षा आहे. तर फ्लाईंग टॅक्सीची सुविधा पुढील वर्षापर्यंत सुरू करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. सुरुवातीला क्वाडकॉप्टरने (एक प्रकारचा ड्रोन) सज्ज असलेल्या टॅक्सीत चार प्रवासी बसू शकतील. प्रवाशांच्या मागणीनुसार त्यांना त्वरित ही फ्लाईंग टॅक्सी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. शहरी ड्रोन वितरण सेवा विकसित करण्यासाठी कंपनीने मलेशियन ग्लोबल इनोव्हेशन अॅन्ड क्रिएटिव्हिटी सेंटरबरोबर संयुक्तपणे भागीदारी केली आहे. हे ही वाचा - बंद पडलेली Jet Airways हिंदुजा ग्रुप घेण्याची शक्यता लवकरच आंतरराज्यीय प्रवास सुरू होईल फर्नांडिस यांनी पुढं सांगितलं की, 'मला आशा आहे की, पुढील दोन ते तीन आठवड्यांत आंतरराज्यीय विमान प्रवासाला सुरुवात होईल. सर्वांना परवडणाऱ्या दरात विमान सेवा सुरू करणारी  एअर एशिया ही आशियातील एकमेव विमान कंपनी आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या