Home /News /money /

AGS Transact IPO : वर्षातील पहिला IPO 19 जानेवारीला ओपन होणार; प्राईज बँड, साईज चेक करा

AGS Transact IPO : वर्षातील पहिला IPO 19 जानेवारीला ओपन होणार; प्राईज बँड, साईज चेक करा

एखादा आयपीओ चांगला असेल आणि तुम्हाला त्यात गुंतवणूक करायची असेल, तुम्हाला त्याचे शेअर्स मिळावेत, अशी इच्छा असेल तर तुम्ही...

एखादा आयपीओ चांगला असेल आणि तुम्हाला त्यात गुंतवणूक करायची असेल, तुम्हाला त्याचे शेअर्स मिळावेत, अशी इच्छा असेल तर तुम्ही...

AGS Transact हा वर्षातील पहिला IPO 19 जानेवारीला उघडेल आणि 21 जानेवारीला बंद होईल. हा IPO 1 फेब्रुवारी रोजी एक्सचेंजमध्ये लिस्ट होण्याची अपेक्षा आहे.

    मुंबई, 14 जानेवारी : शेअर बाजारात (Share Market) मागील वर्षी अनेक IPO यशस्वीरित्या दाखल झाले. यावर्षीही अनेक IPO येण्याच्या तयारीत आहेत. यावर्षीचा पहिला IPO 19 जानेवारीला (First IPO 2022) ओपन होत आहे. पेमेंट सोल्यूशन प्रोव्हायडर कंपनी AGS Transact Technologies आपला IPO आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने या IPO ची किंमत 166-175 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. याआधी, फर्मने आपल्या आयपीओचा आकार 800 कोटी रुपयांवरून 680 कोटी रुपयांपर्यंत कमी केला होता. वर्षातील हा पहिला IPO 19 जानेवारीला उघडेल आणि 21 जानेवारीला बंद होईल. हा IPO 1 फेब्रुवारी रोजी एक्सचेंजमध्ये लिस्ट होण्याची अपेक्षा आहे. हा इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेल असेल ज्यामध्ये प्रमोटर रवी बी गोयल 677.58 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स विकतील. याआधी त्यांची सुमारे 800 कोटी रुपयांची विक्री करण्याचा विचार होता. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि नुकत्याच झालेल्या घसरणीमुळे बाजारातील वाढत्या अनिश्चिततेमुळे सर्व IPO ला विलंब झाला आहे. तसेच त्यांचा आकारही कमी करण्यात आला आहे. IOCL ने जारी केले पेट्रोल-डिझेलचे नवे दर, तुमच्या शहरात काय आहे किंमत नाव न सांगण्याच्या अटीवर एका विश्लेषकाने सांगितले की, अलीकडील कमकुवत लिस्टिंग आणि अनेक IPO ला गुंतवणूकदारांकडून मिळालेला थंड प्रतिसाद यामुळे प्राथमिक बाजाराच्या सेंटिमेंट्सवर परिणाम झाला आहे. याशिवाय जगातील बड्या देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या धोरणांमध्ये कडकपणा आल्याने गुंतवणूकदारांचा उत्साहही थंडावला असून, त्याचा परिणाम प्राथमिक बाजारावर झाला आहे. TOI च्या अहवालानुसार, पेमेंट फर्म MobiKwik ने देखील त्यांच्या IPO योजना मागे ढकलल्या आहेत. द इकॉनॉमिक टाईम्सच्या मते, गो एअरने 3600 कोटींची IPO योजनाही थांबवली आहे. कोणत्या बँक खात्याला लिंक आहे तुमचं Aadhaar Card; असं शोधू शकता चुटकीसरशी AGS Transact Technologies ATM आणि CRM आउटसोर्सिंग कॅश मॅनेजमेंट, डिजिटल पेमेंट सोल्यूशन्स, ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सेवा आणि मोबाइल वॉलेट यांसारख्या सेवांसाठी कस्टमाईज्ड प्रोडक्ट्स आणि सेवा प्रदान करते. कंपनीचे प्रमोटर रवी बी गोयल आणि विनेहा एंटरप्रायझेस आहेत. कंपनीतील दोघांची एकत्रित भागीदारी 97.61 टक्के आहे तर 1.51 टक्के एजीएसटीटीएल कर्मचारी कल्याण ट्रस्टकडे आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या