मराठी बातम्या /बातम्या /मनी /चक्क यज्ञ आणि हवनातून सेंद्रिय शेती, कुठे होतोय हा प्रयोग

चक्क यज्ञ आणि हवनातून सेंद्रिय शेती, कुठे होतोय हा प्रयोग

सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने. शेतकरी सध्या सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत.

सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने. शेतकरी सध्या सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत.

सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने. शेतकरी सध्या सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत.

  • Local18
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

अखंड प्रताप सिंह (कानपूर) 22 मार्च : भारत विविधतेने नटलेला देश आहे. यामुळे वेगवेगळ्या राज्यात अध्यात्मीक महत्व असलेली मंदिरे आहेत. याचबरोबर वेद आणि पुराणांचे महत्व असल्याने भारतात या रुढी परंपरा आहेत. वेद आणि पुराणांमध्ये यज्ञ आणि हवनाद्वारे शरीर, मन आणि वातावरण शुद्ध होत असल्याचे बोलले जाते. दरम्यान सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने. शेतकरी सध्या सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत.

सध्या शेतकरी आपले पिक चांगले येण्यासाठी रासायनिक खतांचा मोठ्या  प्रमाणात वापर करत आहे. अधिक उत्पादनासाठी खते आणि कीटकनाशके मिसळून शेती करत आहे. यामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. यामुळे सेंद्रिय शेतीकडे लोकांची वाटचाल सुरू आहे. दरम्यान बिहारमध्ये शेतीचा नवीन प्रयोग होत आहे. तेथील स्थानिकांनी याला अग्निहोत्र सेंद्रिय शेती असे नाव दिले आहे.

हावीतील शास्त्रज्ञ! मियावाकी पद्धतीनं करतोय झाडं लावण्यावर संशोधन, पाहा Video

येथील शेतकरी आपल्या शेतीला सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवतात. दरम्यान ते यज्ञ देखील करतात या यज्ञामध्ये शेण आणि गोमूत्र मिसळून खत तयार केले जाते, त्याचा वापर शेतीत केला जातो. या खतामुळे पिकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कीटकांचा नाश तर होतोच शिवाय चांगले उत्पादन मिळण्यासही मदत होत असल्याचे शेतकऱ्यांनी माहिती दिली.

पंकज मिश्रा, ज्यांनी या शेतीचा देशभरात प्रचार केला आहे आणि आता स्वतःची स्टार्टअप कंपनी सुरू केली आहे, त्यांनी सांगितले की त्यांच्या वडिलांनी ही शेती 1991 मध्ये कानपूरमध्ये सुरू केली. त्यांचे वडील आर मिश्रा हे कानपूर येथील चंद्रशेखर कृषी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या शेतातील वरुण राय पिकात अग्निहोत्र या कृषी पद्धतीचा वापर केला, ज्याचा चांगला परिणाम झाला. यानंतर त्यांनी या शेतीला देशभर चालना देण्याचे काम केले.

यावेळी एका शेतकऱ्यांने सांगितले की, तो एका कंपनीत मार्केटिंगच्या नोकरीवर होता, पण त्याने नोकरी सोडली आणि अग्निहोत्रा शेतीच्या जाहिरातीसाठी काम करायला सुरुवात केली. त्यांनी स्वतःची एक स्टार्टअप कंपनी देखील उघडली आहे ज्याद्वारे ते देशभरातील शेतकर्‍यांशी संपर्क करत आहेत. अग्निहोत्रा शेतीबद्दल संदेश देत आहेत. याचा त्यांना चांगला फायदा होत आहे. यामुळे देशभरातील लोक या पद्धतीची लागवड करू लागले आहेत.

मराठवाड्यातील छोट्या खगोलशास्त्रज्ञानाला मिळणार मोठी संधी, पाहा Video

आम्ही जमीन सुपीक करण्यासाठी काम करतो, पण पर्यावरणाच्या शुद्धीकरणाकडे कोणाचेच लक्ष जात नाही. धान्य किंवा फळांना सर्वात मोठा धोका प्रदुषणाचा आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण शुद्ध ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. अग्निहोत्राच्या माध्यमातून फळांना 5 टक्के जमिनीतून शुद्धता मिळते, तर 95 टक्के वातावरणातून शुद्धता मिळत असते.

अग्निहोत्र शेती करण्यासाठी 1 एकर जमिनीच्या मध्यभागी यज्ञवेदी तयार केली जाते. जिथे दररोज सकाळी आणि संध्याकाळी 2 मिनिटे यज्ञ केला जातो, ज्यामध्ये देशी गायीचे तांदूळ आणि तूप अर्पण केले जाते. यातून निघणारी राख शेण आणि गोमूत्र मिसळून खत तयार केले जाते, ते पिकांना लावले जाते. यामुळे जमीन शुद्ध होते असे स्थानिक शेतकऱ्यांनी माहिती दिली.

First published:
top videos

    Tags: Local18, Uttar pradesh