मुंबई, 26 मार्च : भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राचं सर्वात जास्त योगदान आहे. संपूर्ण देशाची अन्न-धान्याची गरज पूर्ण करण्याची जबाबदारी देशातील शेतकरी वर्गावर आहे. या शेतकरी वर्गाला वेळोवेळी मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची (एमओए आणि एफडब्ल्यू) स्थापना करण्यात आलेली आहे. कृषी मंत्रालय हे प्रमुख मंत्रालयांपैकी एक असून त्याच्या कामाचा पसाराही जास्त आहे. त्यामुळे या मंत्रालयाला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी मंत्रालयामध्ये वेळोवेळी कर्मचारी भरती केली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगनं (यूपीएससी) कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातील हॉर्टिकल्चर स्पेशलिस्ट पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. एमओए आणि एफडब्ल्यूच्या 2023 भरती अधिसुचनेनुसार, जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप 'अ' राजपत्रित (नॉन-मिनिस्ट्रियल) या वर्गीकरणाअंतर्गत हॉर्टिकल्चर स्पेशालिस्ट पदाची एक जागा रिक्त आहेत.
पोस्टचं नाव, संख्या आणि स्वरूप: एमओए आणि एफडब्ल्यूच्या 2023 भरती अधिसूचनेनुसार हॉर्टिकल्चर स्पेशलिस्ट पदाची एक जागा रिक्त असून ती जनरल मेरिट कॅटेगरीसाठी आहे. हॉर्टिकल्चर स्पेशालिस्ट हे पद जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप 'अ' राजपत्रित (नॉन-मिनिस्ट्रियल) या श्रेणीमध्ये येतं.
नोकरीचा विभाग: हॉर्टिकल्चर स्पेशालिस्ट पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवाराला सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ हॉर्टिकल्चरमध्ये सेवा द्यावी लागेल.
नोकरीचं स्वरूप आणि पोस्टिंगची स्थिती: हॉर्टिकल्चर स्पेशालिस्ट म्हणून निवड झालेल्या व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरीत ठेवलं जाईल. नियुक्ती झाल्यानंतर या व्यक्तीला भारतातील दिमापूर, मेडझिफेमा, नागालँड किंवा परदेशात कुठेही सेवा देण्याची जबाबदारी दिली जाईल.
पे स्केल: एमओए आणि एफडब्ल्यूच्या 2023 भरती अधिसुचनेनुसार हॉर्टिकल्चर स्पेशलिस्ट पदासाठी वेतनश्रेणी स्तर -11 आणि सातव्या वेतन आयोगानुसार 67 हजार 700 ते 2 लाख 8700 हजार रुपये मासिक वेतन मिळेल.
वयोमर्यादा:
1) अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत 30 मार्च 2023 असून अर्जदाराचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
2) 2) भारत सरकारने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांनुसार केंद्र सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशात सरकारी नोकरीवर असलेल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादेत पाच वर्षांची सवलत आहे.
शैक्षणिक पात्रता:
अ) हॉर्टिकल्चर किंवा पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट स्पेशलायझेनसह कृषी विषयातील पदव्युत्तर पदवी, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून हॉर्टिकल्चर विषयाची पदव्युत्तर पदवी आवश्यक.
ब) भारतीय कृषी संशोधन परिषदेची राष्ट्रीय पात्रता चाचणी पास केलेली असावी.
अनुभव : केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेशातील प्रशासन किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (यूटीए), मान्यताप्राप्त स्वायत्त संस्था, संशोधन संस्था किंवा मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठांमध्ये हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट, हॉर्टिकल्चर एक्सटेंशन, हॉर्टिकल्चर रिसर्च, नर्सरी मॅनेजमेंट, प्रोटेक्टेडेट कल्टीव्हेशन, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, फ्लोरिकल्चर, व्हेजिटेबल प्रॉडक्शन यापैकी एका क्षेत्रात काम केल्याचा पाच वर्षांचा अनुभव गरजेचा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: एमओए आणि एफडब्ल्यूच्या 2023 भरती अधिसुचनेनुसार हॉर्टिकल्चर स्पेशालिस्ट पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2023 आहे.
निवड प्रक्रिया: अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या निश्चित झाल्यानंतर लेखी परीक्षा, मुलाखत यांसारख्या पर्यायांमधून योग्य उमेदवाराची निवड केली जाईल.
इतर आवश्यक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी upsconline.nic.in या वेबसाईटवर लॉग इन करावं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job Alert