नेहाल भुरे, भंडारा 25 मार्च : कारलं कितीही कडू असलं तरी शेतकऱ्यांच्या उन्नतीत किती गोडवा निर्माण करतं याचं मुर्तिमंद उदाहरण भंडारा जिल्ह्यात पाहायला मिळालं. पारंपरिक शेतीला फाटा देत भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात येत असलेल्या खोलमारा येथील अमृत मदनकर यांनी तीन एकर शेतीत कारल्याची लागवड केली. आता याच कारल्याची शेतीनं त्यांना लखपती केलं.
कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाच्या छायेत त्यांना पारंपारिक धानाची शेती करावी लागत होती. त्यांना उत्पादन कमी आणि खर्च जास्त यायचा. मात्र या शेतकऱ्याने तीळमात्रही खचून न जाता कृषी विभागाचा सल्ला घेत पारंपरिक धानशेतीला फाटा दिला आणि बागायती शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. तीन एकर शेतीत आधुनिक पद्धतीने कारल्याची लागवड करीत एका वर्षात तब्बल दहा लाख रूपयांचं उत्पन्न घेतलं.
कडू कारल्याची गोड कहाणी..! कारल्याने केली कमाल, शेतकरी झाला मालामाल...तीन एकर शेतात कारल्याची लागवड करून भंडाऱ्यातील शेतकरी झाला लखपती #farming #news18lokmat pic.twitter.com/SQl0InPRP5
— News18Lokmat (@News18lokmat) March 25, 2023
इतकंच नाही तर कारल्यासोबत काकडी,वालाच्या शेंगा, गाजर आणि इतर पालेभाज्यांचे उत्पन्नही ते घेत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत सरकारने प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा गौरवसुद्धा केला आहे. त्यांची कारल्याची शेती ही इतर शेतकऱ्यांसाठीही एक आदर्श बनली आहे. खचून न जाता जिद्दीने केलेल्या या वेगळ्या प्रयोगाने या शेतकऱ्याला लखपती बनवलं आहे.
या कडू कारल्यांनी अमृतच्या जीवनात गोडवा निर्माण केलेला आहे. तेव्हा राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला पारंपारिक शेतीला फाटा देत बागायती शेतीकडे वळून आपल्या जीवनात गोडवा निर्माण करण्याचा आदर्श या शेतकऱ्याने दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Local18, Success story