मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Rakesh Jhunjhunwala Death: राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूनंतर त्यांचं 4ं6 हजार कोटींची साम्राज्य कोण सांभाळणार?

Rakesh Jhunjhunwala Death: राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूनंतर त्यांचं 4ं6 हजार कोटींची साम्राज्य कोण सांभाळणार?

Rakesh Jhunjhunwala Death: राकेश झुनझुनवाला यांची अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. फोर्ब्सच्या जगातील श्रीमंतांच्या यादीत तो 440 व्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 5.8 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 46 हजार कोटी रुपये आहे.

Rakesh Jhunjhunwala Death: राकेश झुनझुनवाला यांची अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. फोर्ब्सच्या जगातील श्रीमंतांच्या यादीत तो 440 व्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 5.8 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 46 हजार कोटी रुपये आहे.

Rakesh Jhunjhunwala Death: राकेश झुनझुनवाला यांची अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. फोर्ब्सच्या जगातील श्रीमंतांच्या यादीत तो 440 व्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 5.8 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 46 हजार कोटी रुपये आहे.

    मुंबई, 14 ऑगस्ट: शेअर बाजारातील बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे आज, रविवारी वयाच्या 62व्या वर्षी निधन झाले. मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलने सकाळी 6.45 वाजता झुनझुनवाला यांच्या मृत्यूची पुष्टी केली. 7 ऑगस्ट रोजी 'आकासा एअर'च्या लाँचिंगवेळी तो मुंबई विमानतळावर व्हील चेअरवर दिसले होते. या विमान कंपनीत त्यांचा मोठा हिस्सा आहे. राकेश झुनझुनवाला यांची अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. फोर्ब्सच्या जगातील श्रीमंतांच्या यादीत तो 440 व्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 5.8 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 46 हजार कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत राकेश झुनझुनवाला निघून गेल्याने विमान कंपनीला अडचणी येणार का? पुढे त्याचे साम्राज्य कोण चालवणार? अशी अनेक प्रश्न पडले आहेत, याबाबत जाणून घेऊया. राकेश झुनझुनवाला यांचा व्यवसाय कोण सांभाळणार? राकेश झुनझुनवाला यांनी खूप मोठे साम्राज्य मागे सोडले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी रेखा झुनझुनवाला, मुलगी निष्टा झुनझुनवाला, मुले आर्यमन आणि आर्यवीर झुनझुनवाला असा परिवार आहे. राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती सुमारे 46 हजार कोटी रुपये आहे. राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीची अकासा एअरमध्ये 40% पेक्षा जास्त भागीदारी आहे. ते स्टार हेल्थ अलाईड इन्शुरन्सचे प्रमोटर देखील आहेत. जून तिमाहीत, यात त्यांची हिस्सेदारी सुमारे 17.46% होती. अशा परिस्थितीत आता हे साम्राज्य सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आली आहे. आता त्या आपल्या मुलांसोबत हे काम सांभाळतील. झुनझुनवाला यांच्या जाण्याने त्यांच्या एअरलाईन आणि अन्य व्यवसायासमोर आता मोठी आव्हाने येऊ शकतात. Rakesh Jhunjhunwala यांनी PM मोदींना सांगितलं चुरगळलेल्या शर्टचं सिक्रेट, काय होता तो किस्सा शेअर बाजारातील गुंतवणूक राकेश झुनझुनवाला हे भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जातात. ते देशातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. राकेश झुनझुनवाला यांनी 1985 मध्ये 5000 रुपयांची गुंतवणूक सुरू केली. त्यावेळी बीएसईचा निर्देशांक 150 वर होता. पत्नी रेखा यांच्या सांगण्यावरून त्यांनी 2003 मध्ये स्वत:ची स्टॉक ट्रेडिंग फर्म RARE एंटरप्रायजेसची स्थापना केली. कंपनीच्या नावात त्यांनी स्वतःच्या आणि पत्नी रेखाच्या नावाची Rakesh मधील RA आणि Rekha मधील RE ही दोन अक्षरे घेतली. उपलब्ध माहितीनुसार, राकेश झुनझुनवाला यांच्या जून तिमाहीत 32 कंपन्या आहेत. या 32 कंपन्यांमध्ये अनंत राज, टाटा मोटर्स, टायटन, फेडरल बँक, नजरा, स्टार हेल्थ आदी कंपन्यांचा समावेश आहे. सरकारकडून विवाहित जोडप्यांना मिळतात 72000 रुपये, तुम्हीही घेऊ शकता लाभ एअरलाईन बिझनेस राकेश झुनझुनवाला यांनी अकासा एअरलाइनमध्ये सुमारे 278 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या एअरलाइनमध्ये त्यांची सुमारे 40% हिस्सेदारी आहे. इंधनाच्या किमती खूप वाढलेल्या आणि अनेक कंपन्या समस्यांशी झुंजत असताना त्यांनी एअरलाइन व्यवसायात प्रवेश केला. मात्र, अकासा एअरच्या लॉन्चिंगवेळी ते म्हणाले होते, 'अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. मी एअरलाइन का सुरू केली? त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी मी असे म्हणेन की मी फेल होण्यास तयार आहे. प्रयत्न न करण्यापेक्षा प्रयत्न केल्यानंतर अपयशी होणे चांगले.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या