Home /News /money /

3 दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त झालेलं सोनं पुन्हा महागलं, सोमवारचे दर इथे पाहा

3 दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त झालेलं सोनं पुन्हा महागलं, सोमवारचे दर इथे पाहा

गेल्या आठवड्यातील 3 दिवसांंमध्ये सोन्याचे दर 1000 रुपयांनी कमी झाले होते. पण सोमवारी सोन्याचे दर (Gold Prices Today) वधारलेले पाहायला मिळाले.

    नवी दिल्ली, 2 मार्च : गेल्या आठवड्यात सोन्याचे दर 5.5 टक्क्यांनी कमी झाल्यानंतर सोमवारी सोन्याच्या दरामध्ये काहीशी तेजी पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यातील 3 दिवसांंमध्ये सोन्याचे दर 1000 रुपयांनी कमी झाले होते. पण सोमवारी सोन्याचे दर (Gold Prices Today) वधारलेले पाहायला मिळाले. दिल्लीतील सराफा बाजारात प्रति तोळा सोन्याची किंमत 391 रुपयांनी वाढली आहे. सोन्यापाठोपाठ आजच्या चांदीच्या दरातही (Silver Prices Today) वाढ झाली आहे. प्रति किलो चांदीची किंमत 713 रुपयांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी प्रति तोळा सोन्याचा दर 222 रुपयांनी तर प्रति किलो चांदीचा दर 60 रुपयांनी घसरला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवरही झाला आहे. सोन्याचा नवा दर राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा दर 391 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे प्रति तोळा सोन्याचे दर 42 हजार 225 रुपयांनी वाढून 42 हजार 616 रुपयांवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 1 हजार 604 डॉलर प्रति औंस आहे. चांदीचा नवा दर सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात प्रति तोळा चांदीची किंमत 713 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे प्रति किलो चांदीची किंमत 45 हजार 500 रुपयांवरून 46 हजार 213 रुपयांवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 17 डॉलर प्रति औंस आहे. (हे वाचा-ऑनलाईन फूडसाठी मिळणार आणखी एक पर्याय, झोमॅटो-स्वीगीला अॅमेझॉन देणार टक्कर) विश्लेषकांच्या मते, सोन्याच्या किंमती अस्थिर राहण्याची शक्यता आहे. पण सध्या बाजारात तेजी राहण्याची शक्यता आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याची किमत 42 हजारांवर आहे. 'Coronvirus चा प्रादुर्भाव, कमजोर झालेली जागतिक इक्विटी आणि अमेरिकन डॉलरही घसरला आहे. अशा परिस्थितीत सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे सोन्याच्या गुंतवणूकीत वाढ झाली आहे,' अशी माहिती Geojit Financial Services चे प्रमुख हरिश वी. यांनी मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या