नवी दिल्ली, 05 मार्च: खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) गृहकर्जावरील व्याजदर 6.7 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. 05 मार्च रोजी आयसीआयसीआय बँकेने याबाबत घोषणा केली आहे. आयसीआयसीआय बँकेकडून लागू करण्यात आलेला नवा व्याजदर हा गेल्या 10 वर्षातील सर्वात कमी दर आहे. आजपासून नवीन व्याजदर लागू होत आहे. त्यामुळे तुम्ही देखील घरासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.
ग्राहकांना 75 लाखापर्यंतच्या गृहकर्जासाठी (Home Loan upto 75 Lakh) 6.7 या व्याजदराने गृहकर्ज मिळेल. 75 लाखांपेक्षा जास्त कर्ज जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्हाला 6.75 टक्के दराने व्याज द्यावे लागेल.
खरेदी करा तुमचं ड्रीम होम
'आम्ही गेल्या काही महिन्यांत ग्राहक त्यांच्या स्वत: च्या वापरासाठी घरे खरेदी करू इच्छित असल्याने मागणीत वाढ झाल्याचे पाहिले आहे. सध्याच्या कमी व्याजदराचा विचार करता, त्याला किंवा तिला स्वत: चे 'ड्रीम होम' विकत घेण्याची ही योग्य संधी आहे असा आमचा विश्वास आहे,' अशी प्रतिक्रिया आयसीआयसीआय बँकेचे सिक्युअर्ड अॅसेट्सचे प्रुख रवी नारायणन यांनी दिली आहे.
#JustIn: #ICICIBank reduces #homeloan interest rate to 6.70%, the lowest by the Bank in 10 years! Experience a fully digital #homeloan application process, through Bank’s website or mobile banking platform, ‘iMobile Pay’ or at the branch. Visit: https://t.co/jrgBcu1ifL pic.twitter.com/kZeNcBKEnC
— ICICI Bank (@ICICIBank) March 5, 2021
(हे वाचा-Reliance समुहाचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या कोरोना लशीचा खर्च कंपनी उचलणार)
SBI, HDFC ने देखील कमी केले व्याजदर
गेल्याच आठवड्यात देशातील सर्वात मोठी कर्जदाता बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) त्याचप्रमाणे कोटक महिंद्रा बँकेने व्याजदर कमी केला आहे. या आठवड्यात एचडीएफसी बँकेने देखील गृहकर्ज कमी केलं आहे. एसीबआय आणि एचडीएफसी बँकेने गृहकर्जावरील व्याज अनुक्रमे 6.7% आणि 6.75% केलं आहे. तर कोटक महिंद्रा बँक याहीपेक्षा कमी 6.65% व्याजदराने गृहकर्ज देत आहे.
(हे वाचा-आजपासून स्वस्तात खरेदी करा घर, गाडी, जमीन; SBI देतंय स्वप्न पूर्ण करण्याची संधी)
बँकेने व्याजदर कपातीची घोषणा करताना आणखी एक महत्त्वाती माहिती दिली आहे ती म्हणजे ज्यांना घरखरेदी करायचे आहे पण ते आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक नाही आहेत, ते देखील गृहकर्जासाठी अर्ज करू शकतात. त्याकरता त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागेल. असे ग्राहक बँकेच्या वेबसाइटवरुन किंवा मोबाइल बँकिंग प्लॅटफॉर्म असणाऱ्या iMobile Pay वरून गृहकर्जासाठी अर्ज करू शकतात.