पेट्रोलनंतर सोनं-चांदीही झालं स्वस्त, 'हे' आहेत सोमवारचे दर

पेट्रोलनंतर सोनं-चांदीही झालं स्वस्त, 'हे' आहेत सोमवारचे दर

Gold, Silver - आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळालीय. जाणून घ्या आजचे दर

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर खूशखबर आहे. आज ( 29 जुलै ) सोन्या-चांदीच्या दरात घसरण झालीय. दिल्लीत सोन्याचा भाव 50 रुपयांनी कमी होऊन 35,720 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय. तर चांदी 100 रुपयांनी कमी झालीय. चांदीचा भाव 41,900 रुपये प्रति किलोग्रॅम झालाय.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं 1,419.40 डाॅलर प्रति औंस आहे. तर न्यूयाॅर्कमध्ये चांदीत घसरण होऊन चांदी 16.44 डाॅलर्स प्रति औंस राहिली.

Moneycontrol Pro आता वेबसाइट,अ‍ॅपवर उपलब्ध! आर्थिक नियोजन अधिक सोपं

दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 50 रुपयांनी कमी होऊन 35,720 रुपये झालीय. तर 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 35,550 रुपये प्रति 10 ग्रॅम झालीय. गिन्नी सोन्याची किंमत 27,500 रुपये प्रति 8 ग्रॅमवर स्थिर राहिलीय. शुक्रवारी सोन्याची किंमत 40 रुपयांनी वाढली होती, तर शनिवारी चांदीत घसरण झाली होती.

चांदी 100 रुपयांनी कमी झालीय. चांदीचा भाव 41,900 रुपये प्रति किलोग्रॅम झालाय. साप्ताहिक डिलिवरी चांदीत 34 रुपयांची वाढ झालीय. तिचा दर  41,186 रुपये प्रति किलोग्रॅम राहिला.

इन्कम टॅक्स रिटर्न भरताय? मग 'ही' काळजी घ्यायलाच हवी

चांदीचा सिक्का लिवाली आणि बिकवाली क्रमश: 84 हजार आणि 85 हजार रुपये प्रति शेकडा आहे.

आज ( 29 जुलै ) सोन्या-चांदीचे दर कमी झाले असले तरी पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.

रोज करा 40 रुपयांची बचत आणि 'अशा' प्रकारे मिळवा 8 लाख

सोन्या-चांदीप्रमाणे आज सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण झालीय. गेल्या आठवड्यात पेट्रोलचे दर कमी होते. पण डिझेलचे भाव स्थिर राहिले होते. देशाच्या मेट्रो शहरांमध्ये पेट्रेलचे दर जवळजवळ 15 पैसे आणि डिझेल जवळजवळ 12 पैशांनी कमी झालंय.

दिल्लीत आज ( 29 जुलै ) पेट्रोलची किंमत 72.99 रुपये प्रति लीटर आहे. म्हणजे त्यात 15 पैशांची घसरण झालीय. तर डिझेल 66.07 रुपये प्रति लीटर आहे. म्हणजे  11 पैसे कमी झालेत.

दिल्लीत एक लीटर पेट्रोल 72.99 रुपये आणि डिझेल 66.07 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत 1 लीटर पेट्रोल 78.61 रुपये आणि डिझेल 69.25 रुपये, कोलकत्तामध्ये पेट्रोल 75.63 रुपये आणि डिझेल 68.22 रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल 75.80 रुपये आणि डिझेल 69.78 रुपये आहे.

VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी हाय-टेक रथ दाखल, अशा आहे सुविधा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Jul 29, 2019 06:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading