मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Parag Agrwal Twitter New CEO : इलॉन मस्क यांचं ट्वीट वाचून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल

Parag Agrwal Twitter New CEO : इलॉन मस्क यांचं ट्वीट वाचून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने (Twiiter) भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल यांची नवीन सीईओ (Parag Agrwal Twitter New CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. पराग यांनी ट्विटरमध्ये 11 वर्षांपेक्षा कमी कालावधीत हे यश मिळवले आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 30 नोव्हेंबर : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने (Twiiter) भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल यांची नवीन सीईओ (Parag Agrwal Twitter New CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. पराग यांनी ट्विटरमध्ये 11 वर्षांपेक्षा कमी कालावधीत हे यश मिळवले आहे. यादरम्यान त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनीअर ते सीईओ असा प्रवास केला आहे. पराग यांच्या निवडीनंतर जगभरातील दिग्गज कंपन्यांच्या सीईओपदी आणखी एका भारतीयाची निवड झाली आहे. यामुळे भारतीय टॅलेन्टची जगभरात चर्चा होत आहे.

जगातील सर्वात मोठे श्रीमंत इलॉन मस्क (Elon Musk) यांनी या निमित्ताने भारतीय प्रतिभेचे कौतुक केले आहे. टेस्ला (Tesla) या जगातील सर्वात वॅल्युएबल ऑटो कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी आयरिश उद्योजक पॅट्रिक कॉलिसन यांचं ट्वीट रिट्वीट करत म्हटलं की, "अमेरिकेला भारतीय टॅलेन्टचा खुप फायदा झाला आहे." जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या या ट्वीटमुळे नक्कीच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल.

पॅट्रिक कॉलिसन यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, "Google, Microsoft, Adobe, IBM, Palo Alto Networks आणि आता Twitter चे नेतृत्व भारतीय वंशाचे CEO करत आहेत. तंत्रज्ञानाच्या जगात भारतीयांचे आश्चर्यकारक यश आणि अमेरिका स्थलांतरितांना देत असलेल्या संधी पाहणे आश्चर्यकारक आहे. अभिनंदन पराग."

फोटोत दिसणाऱ्या या आई-वडिलांसाठी अभिमानास्पद क्षण, मुंबईकर मुलाची जगभर चर्चा

पराग अग्रवाल 2011 पासून ट्विटरमध्ये कार्यरत

IIT-Bombay आणि Stanford University चे माजी विद्यार्थी असलेले पराग अग्रवाल 2011 पासून Twitter वर काम करत आहेत आणि 2017 पासून कंपनीचे CTO आहेत. जेव्हा ते कंपनीत सामील झाला तेव्हा कंपनीची कर्मचारी संख्या 1,000 पेक्षा कमी होती. डोर्सी 2022 मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत संचालक मंडळावर राहतील. अग्रवाल यांनी ट्विटरवर लिहिले की, या नियुक्तीमुळे मी अत्यंत सन्मानित आणि आनंदी आहे आणि डोर्सी यांच्या "सतत मार्गदर्शन आणि मैत्री" बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.

First published:

Tags: Elon musk, Twitter