कांद्यानंतर आता डाळीची किंमतही 100 रुपयांवर, हे आहे कारण

कांद्यानंतर आता डाळीची किंमतही 100 रुपयांवर, हे आहे कारण

तूरडाळीच्या आयातीचा कोटा पूर्ण न झाल्याने डाळीचे भाव वाढण्याची अपेक्षा आहे. सरकारने 4 लाख टन तूर आयाताची कोटा नक्की केला होता.हा कोटा पूर्ण झाला नसल्याने तूरडाळ महागणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : कांद्याच्या वाढत्या भावामुळे सामान्य माणसाच्या डोळ्यात पाणी आलंय. महानगरांमध्ये कांद्याचे भाव 100 ते 120 रुपये किलोवर पोहोचले आहेत. भाजी बाजारात कांद्याचा पुरवठा वाढला नाही तर हे भाव अजून वाढू शकतात,असा अंदाज आहे. त्यातच आता तूरडाळीचे भावही वाढल्याने महागाईची चिंता आणखीनच तीव्र झालीय.

तूरडाळीचे भाव 98 रुपये प्रतिकिलो झालेत. सरकारने तूरडाळीसाठी 4 लाख टन कोटा ठरवला आहे. व्यापाऱ्यांनी आतापर्यंत 2.15 लाख टन तूरडाळच आयात केली आहे. या स्थितीत सरकार यासाठीची डेडलाइन 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्याची तयारी करतंय.

डेडलाइन वाढवण्याची मागणी

सरकारने पहिल्यांदा व्यापाऱ्यांना आदेश दिला होता. परदेशातून खरेदी केलेली तूरडाळ ऑक्टोबर महिन्यात भारतात आणण्याचे निर्देश सरकारने दिले होते. पण आता ही डेडलाइन 15 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आलेत. व्यापाऱ्यांनी ही तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती.

(हेही वाचा : या काँग्रेस नेत्याने शपथविधीआधी उद्धव ठाकरेंना तुरुंगातून दिला सल्ला)

का वाढणार दर?

तूरडाळीच्या आयातीचा कोटा पूर्ण न झाल्याने डाळीचे भाव वाढण्याची अपेक्षा आहे. सरकारने 4 लाख टन तूर आयाताचा कोटा नक्की केला होता.हा कोटा पूर्ण झाला नसल्याने तूरडाळ महागणार आहे. याआधीही तूरडाळीच्या किंमतीने कळस गाठला होता. त्यावेळी सामान्य माणसाच्या नाकीनऊ आले होते. कांद्याचे दर वाढलेले असतानाच तूरडाळीच्या किंमती अशाच वाढत राहिल्या तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागणार आहेत.

अवकाळी पावसामुळे कांद्याचं नुकसान

यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पूर्ण सडला. कांद्याचा पुरवठा कमी झाल्याने भाव वाढले होते. आता तूरडाळ आयात केली नाही तर भाव आणखी वाढू शकतात.

Published by: Arti Kulkarni
First published: November 28, 2019, 5:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading