मराठी बातम्या /बातम्या /मनी /कोरोना काळानंतर घरखरेदीमध्ये पुरुषांपेक्षा महिला ठरतायंत अग्रेसर, मिळतोय हा फायदा

कोरोना काळानंतर घरखरेदीमध्ये पुरुषांपेक्षा महिला ठरतायंत अग्रेसर, मिळतोय हा फायदा

पुरुषांपेक्षा महिलांचा घर खरेदी करण्याकडे कल वाढला असल्याचं पहायला मिळत आहे. कोरोना महामारीनंतर (Corona Virus Pandemic) बहुतेक भारतीय महिला घर खरेदी करण्यासाठी इच्छुक आहेत.

पुरुषांपेक्षा महिलांचा घर खरेदी करण्याकडे कल वाढला असल्याचं पहायला मिळत आहे. कोरोना महामारीनंतर (Corona Virus Pandemic) बहुतेक भारतीय महिला घर खरेदी करण्यासाठी इच्छुक आहेत.

पुरुषांपेक्षा महिलांचा घर खरेदी करण्याकडे कल वाढला असल्याचं पहायला मिळत आहे. कोरोना महामारीनंतर (Corona Virus Pandemic) बहुतेक भारतीय महिला घर खरेदी करण्यासाठी इच्छुक आहेत.

मुंबई, 05 मार्च: पुरुषांपेक्षा महिलांचा घर खरेदी करण्याकडे कल वाढला असल्याचं पहायला मिळत आहे. कोरोना महामारीनंतर (Corona Virus Pandemic) बहुतेक भारतीय महिला घर खरेदी करण्यासाठी इच्छुक आहेत. तर बहुतेक महिलांना रिअल इस्टेटमध्ये (real estate) गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. एका अहवालानुसार, घर खरेदीमध्ये महिला मुख्य भूमिकेत आहेत. जवळपास 71 टक्के महिला तयार असलेले (Rady to move) घर खरेदी करणं जास्त पसंत करतात. तर 62 टक्के महिला प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करु इच्छितात.

प्रॉपर्टी कन्सल्टंट कंपनी अॅनारॉकच्या (Anarock Survey) सर्व्हेनुसार, कोरोनापूर्वी रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 57 टक्के महिला उत्सुक होत्या. तर आता ताज्या सर्वेक्षणामध्ये ही आकडेवारी वाढली असून त्यामध्ये 62 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. सर्व्हेमध्ये असं म्हटलं आहे की, 'आता बहुतेक महिला घर खरेदी करण्यासाठी ‘रेडी टू मूव्ह’ घर खरेदीला जास्त प्राधान्य देत आहेत. म्हणजे त्या अपूर्ण बांधकाम असलेल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे टाळत आहेत.

जाणून घ्या महिलांना कसं घरं पाहिजे

सर्वेक्षण अहवालानुसार, जवळपास 70 टक्क्यांपेक्षा अधिक महिलांनी सांगितलं की घर खरेदी करण्यासाठी ही सर्वात चांगली वेळ आहे. यामध्ये जवळपास 66 टक्के महिला अशा आहेत ज्या अर्फोडेबल हाउसिंगमध्ये (affordable and mid-segment housing) गुंतवणूक करू इच्छितात. म्हणजे या महिला 90 लाख रुपये आणि त्यापेक्षा कमी किंमतीच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांची रुची आहे. तर 5 टक्के महिला 2.5 कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करु इच्छितात.

(हे वाचा-घर घेण्याची सुवर्णसंधी! SBI-HDFCनंतर ही बँक देतेय 10 वर्षातील सर्वात कमी व्याजदर)

सर्वाधिक महिलांना बेडरुम, किचन आणि हॉल (1BHK) या फॉरमॅटमध्ये घर घरेदी करण्याची इच्छा आहे. तर जवळपास 46 टक्के महिला 3BHK, 30 टक्के महिला 2BHK आणि 10 टक्के महिला 4BHK घर खरेदी करू इच्छितात.

स्वस्त होम लोनमुळे महिला प्रभावित

सर्व्हेनुसार, 82 टक्के महिला वैयक्तिक वापरासाठी घर खरेदी करु इच्छितात. तर फक्त 18 टक्के महिला गुंतवणुकीसाठी घर खरेदी करु इच्छितात. या अहवालात असं म्हटलं आहे की, 'या महिला घर विकासकांच्या आकर्षक ऑफर्स, डिस्काउंट आणि स्वस्त होम लोनमुळे खरेदी करण्याचा विचार करत आहेत.'

(हे वाचा-Reliance समुहाचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या कोरोना लशीचा खर्च कंपनी उचलणार)

अॅनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टंटचे रिसर्च हेड आणि डायरेक्टर प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं की, 'भारतीय महिला आता फायनॅन्शियल सिक्युरिटीऐवजी गुंतवणूक पोर्टफोलिओला वैविध्यपूर्ण बनवत आहेत. जवळपास 62 टक्के महिला रियल इस्टेटला प्राधान्य देत आहेत. तर सर्वेक्षणामध्ये सहभागी 54 टक्के पुरुष शेअर बाजार, एफडी आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करु इच्छितात. दरम्यान, Anarock ने हे सर्वेक्षण फेब्रुवारीमध्ये केलं होतं. हे सर्वेक्षण 3900 लोकांवर आधारित असून यामध्ये 39 टक्के महिलांचा समावेश आहे.

सरकारी योजनांचा मिळतो लाभ

ज्या महिलांना घर खरेदी करायचे आहे त्यांच्यासाठी अनेक सरकारी योजना उपलब्ध आहेत. यासाठी 2015 मध्ये पंतप्रधान आवास योजना लाँच करण्यात आली होती. या योजनेनुसार घर खरेदी करताना महिला सहमालकीण असणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त घर खरेदी करताना महिलांना स्टँप ड्युटी कमी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही बँका पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी व्याजावर कर्ज देतात. दोन्ही दरांमध्ये साधारण 0.25 टक्क्यांचा फरक आहे.

First published:

Tags: Home Loan, Money