• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • कोरोना महामारीनंतर पालकांचा बचत आणि गुंतवणुकीसाठी विमा उत्पादनांकडे कल : सर्व्हे

कोरोना महामारीनंतर पालकांचा बचत आणि गुंतवणुकीसाठी विमा उत्पादनांकडे कल : सर्व्हे

मुलांच्या शिक्षणाचे नियोजन (Education Planning) करताना भारतीय पालकांच्या आर्थिक तयारीवर साथीच्या रोगाचा प्रभाव समजून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

 • Share this:
  मुंबई, 15 नोव्हेंबर : कोविड-19 साथीच्या (Corona Crises) आजारानंतर पालकांसाठी बचत आणि गुंतवणुकीचा पसंतीचा (Investment options) पर्याय म्हणून विमा उत्पादने उदयास आली आहेत. एका सर्वेक्षणानुसार, भविष्यातील उद्दिष्टे (Future Goals) पूर्ण करण्यासाठी विमा उत्पादने ही कमी-जोखीम आणि विश्वासार्ह आर्थिक साधने आहेत. एजिस फेडरल लाइफ इन्शुरन्स (Ageas Federal Life Insurance) आणि 'YouGov' इंडिया द्वारे आयोजित 'फ्यूचर फिअरलेस सर्व्हे' दाखवते की जीवनातील इतर उद्दिष्टांपेक्षा शिक्षणासाठी बचतीला प्राधान्य दिले आहे. मुलांच्या शिक्षणाचे नियोजन (Education Planning) करताना भारतीय पालकांच्या आर्थिक तयारीवर साथीच्या रोगाचा प्रभाव समजून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. देशभरातील 11 शहरांमध्ये ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ज्यांची मुले 10 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत अशा 1,333 पालकांचे मत घेण्यात आले. शिक्षणाचा वाढता खर्च पाहता पालक लग्न किंवा करिअरसारख्या इतर उद्दिष्टांपेक्षा शिक्षणासाठी बचत करण्याला प्राधान्य देत असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. आपल्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्याची पालकांची इच्छा देखील त्यात समाविष्ट आहे. SBI ची खास सुविधा, एटीएम कार्ड नसतानाही काढा पैसे; काय आहे प्रोसेस? सर्वेक्षण केलेल्या दोन तृतीयांश पालकांनी त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लान्स (ULIPs), मनीबॅक प्लॅन आणि एंडोमेंट प्लॅन यांसारख्या जीवन विमा उपायांमध्ये गुंतवणूक केली आहे. राज्यातील या बँकेत खाते असेल तर तुम्हाला काढता येतील फक्त 1000 रु! हे आहे कारण  सर्वेक्षणात सहभागी झालेल्या बहुतेक पालकांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या मुलाच्या कॉलेज किंवा उच्च शिक्षणासाठी बचत करायची आहे. याच 40 टक्के पालकांचे म्हणणे आहे की ते त्यांच्या मुलांच्या शालेय शिक्षणासाठी बचत करतील. बहुतेक पालकांनी आधीच त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी स्वतंत्र तरतूद केली आहे.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: