मराठी बातम्या /बातम्या /मनी /हिंडेनबर्गचा आणखी एका दिग्गज कंपनीवर 'रिपोर्ट बॉम्ब'; काही तासात शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले

हिंडेनबर्गचा आणखी एका दिग्गज कंपनीवर 'रिपोर्ट बॉम्ब'; काही तासात शेअर्स 20 टक्क्यांनी कोसळले

हिंडेनबर्गचा आणखी एका कंपनीवर 'रिपोर्ट बॉम्ब';

हिंडेनबर्गचा आणखी एका कंपनीवर 'रिपोर्ट बॉम्ब';

अमेरिकेतील हिंडनबर्ग संस्थेने आणखी एका दिग्गज कंपनीबाबत रिपोर्ट सादर केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 23 मार्च : काही दिवसांपूर्वीच अमेरिकास्थित हिंडनबर्गच्या रिपोर्टने भारतात खळबळ उडाली होती. या अहवालानंतर देशातील अदानी समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर्स पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळले होते. हे प्रकरण शांत होत नाही तोच आणखी एका एका दिग्गज कंपनीबाबत हिंडनबर्गने मोठे खुलासे केले आहेत. यावेळी ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांची पेमेंट फर्म आरोपाच्या पिंजऱ्यात आहे. हिंडेनबर्गने म्हटले आहे की त्यांनी ब्लॉक इंक वर एक शॉर्ट पोजीशन घेतली आहे. कंपनीने आपल्या यूजर्सच्या संख्येत अतिशयोक्ती केल्याचं या अहवालात म्हटलं आहे. अहवालानंतर ब्लॉकचे शेअर्स 20 टक्क्यांनी पडले आहेत. रिपोर्टनुसार, ब्लॉकचे शेअर 75 टक्क्यांपर्यंत कोसळू शकतो.

अहवालात काय आरोप आहे?

अहवालात लिहिले आहे की, त्यांच्या 2 वर्षांच्या संशोधनात हे समोर आले आहे की, कंपनी जगातील ज्या भागात काम करत आहे, तेथील ग्राहक आणि सरकार यांची सतत फसवणूक करत आहे. कंपनी नियमांची पायमल्ली करत असून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या नावाखाली मोठ्ठ शुल्क आकारून नुकसान करणाऱ्या लोकांना कर्जे वितरित करत आहे. यासोबतच कंपनी चुकीची आकडेवारी देऊन गुंतवणूकदारांना फसवत असल्याचा गंभीर आरोपही यात करण्यात आला आहे.

बनावट डेटाच्या मदतीने, महामारीच्या काळात, ब्लॉकचा स्टॉक फक्त 18 महिन्यांत 639 टक्क्यांनी वाढला, त्यानंतर सह-संस्थापक जॅक डोर्सी आणि जेम्स मॅकेल्वे यांनी एकूण $100 दशलक्ष किमतीचे शेअर्स विकून मोठी कमाई केली.

हिंडनबर्गच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, कंपनीत काम केलेले कर्मचारी, भागीदार, उद्योग तज्ञ यांच्याशी झालेल्या केसेस आणि संभाषणाच्या नोंदींच्या आधारे ही माहिती मिळवण्यात आली आहे.

वाचा - कमी पैशात करा बिझनेस क्लासमध्ये सफर, 'या' फ्लाइंट अटेंडेंटने सांगितली ट्रिक!

बहुतेक विश्लेषक ब्लॉकच्या कॅश अॅप प्लॅटफॉर्मच्या वाढीबद्दल खूप उत्साही होते आणि कमी खर्च आणि वेगाने वाढणारा युजर्सच्या आधारे मार्जिनमध्ये मोठी उडी दिसण्याची अपेक्षा होती. संशोधनात असे दिसून आले की ब्लॉकमुळे वापरकर्त्यांच्या संख्येत बरीच वाढ झाली आहे. काही माजी कर्मचाऱ्यांनी माहिती दिली की त्यांनी रीव्यू केलेल्या 40-75% खाती बनावट असल्याचे आढळले आहे.

याच अहवालात असे म्हटले आहे की जेव्हा जेव्हा एखादा वापरकर्ता फसवणूक करताना किंवा नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले तेव्हा ब्लॉकने खाते ब्लॅकलिस्ट केले. मात्र, वापरकर्त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. या अहवालात थेट आरोप करण्यात आला आहे की गुन्हेगारांना कॅश अॅपचा खूप फायदा होतो.

ब्लॉक काय आहे?

ब्लॉक हे पूर्वी स्क्वेअर म्हणूनही ओळखले जात होते. कंपनीचे मार्केट कॅप 44 अब्ज डॉलर आहे. कंपनीचा दावा आहे की ज्या लोकांना बँकिंगमध्ये प्रवेश नाही किंवा ज्यांना मर्यादित बँकिंग सुविधा आहेत, त्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय आर्थिक तंत्राने मदत करते. हिंडनबर्ग अहवालात असे नमूद केले आहे की ब्लॉकने बँकिंगमध्ये प्रवेश न करता गुन्हेगारांना प्रत्यक्षात मदत केली आहे.

First published:
top videos

    Tags: Share market