• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Petrol Diesel Price Today: सलग चार दिवसांच्या दरवाढीनंतर काय आहे पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव?

Petrol Diesel Price Today: सलग चार दिवसांच्या दरवाढीनंतर काय आहे पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव?

चार दिवसांपासून सलग इंधन दरात वाढ होत असताना आज दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेल दरात कोणतीही वाढ केलेली नाही.

 • Share this:
  नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर : IOCL ने आज सोमवारी 4 ऑक्टोबर रोजी पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी केल्या आहेत. चार दिवसांपासून सलग इंधन दरात वाढ होत असताना आज दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेल दरात कोणतीही वाढ केलेली नाही. याआधी भारतीय तेल कंपन्यांनी रविवारी 3 ऑक्टोबर रोजी पेट्रोल दरात 25 पैसे प्रति लीटर आणि डिझेल दरात 30 पैसे प्रति लीटरची वाढ केली होती. वाढत्या दरांमुळे देशात इंधनाचे दर नव्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचले आहेत. सलग चार दिवस पेट्रोल दर वाढवण्यात आले होते. चार महानगरातील पेट्रोल-डिझेल भाव (Petrol Diesel Price on 04 October 2021) - >> दिल्लीत पेट्रोल 102.39 रुपये आणि डिझेल 90.77 रुपये प्रति लीटर >> मुंबईत पेट्रोल 108.43 रुपये आणि डिझेल 98.48 रुपये प्रति लीटर >> चेन्नईत पेट्रोल 100.01 रुपये आणि डिझेल 95.31 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 103.07 रुपये आणि डिझेल 93.87 रुपये प्रति लीटर आणखी वाढू शकतो पेट्रोल-डिझेल दर - आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल दरात सलग पाचव्या दिवशी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती तीन वर्षांत पहिल्यांदा 80 डॉलर प्रति बॅरल जवळपास पोहोचू शकतात. सध्या कच्च्या तेलाच्या किंमतीत दिलासा मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढू शकतात.

  या बँकेत होईल मोठा फायदा, दर महिन्याला 28 रुपये जमा करुन मिळेल 4 लाखांचा बेनिफिट

  या राज्यात पेट्रोल 100 पार - देशभरात जवळपास 19 राज्यात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोहोचला आहे. यात मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाख सामिल आहे. त्याशिवाय महानगरात मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल आधीपासूनच 100 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशात पेट्रोल-डिझेल दरात वाढ होत आहे. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
  Published by:Karishma
  First published: