लष्करामध्ये 'या' पदासाठी सुरू आहे भरती, असा करा अर्ज

AFMS Recruitment 2019 - सैन्यात फक्त सैनिक म्हणून नाही, तर अनेक पदांवरही संधी असते

News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2019 07:52 PM IST

लष्करामध्ये 'या' पदासाठी सुरू आहे भरती, असा करा अर्ज

मुंबई, 22 जून : तुम्हाला भारतीय सैन्याच्या हाॅस्पिटलमध्ये काम करायचंय? डाॅक्टर म्हणून काम करण्याची उत्तम संधी आलीय. सशस्त्र सेना वैद्यकीय भरती सुरू आहे. आर्म्ड फोर्स मेडिकल सर्विसेस (AFMS )नं शाॅर्ट सर्विस कमिशन्ड ( SSC ) आॅफिसर पदासाठी अर्ज मागवलेत. जे एमबीबीएस उत्तीर्ण आहेत त्यांनी या पदासाठी अर्ज करावा. SSC आॅफिसर पदासाठी 150 जागा आहेत. त्याबद्दलची माहिती पुढीलप्रमाणे-

पद

शाॅर्ट सर्विस कमिशन्ड ( SSC )

एकूण जागा

150

Loading...

ISRO मध्ये 'या' पदांवर होतेय भरती, 10वी झालेले करू शकतात अर्ज

शैक्षणिक पात्रता

MBBS, डिप्लोमाधारकही अर्ज करू शकतात

...म्हणून गेल्या 3 दिवसांत सोनं 630 रुपयांनी झालं महाग

वयाची अट

31 डिसेंबर 2019ला 45 वर्षापर्यंत

फक्त 1.30 लाखात सुरू करा 'हा' व्यवसाय आणि कमवा 5.5 लाख रुपये

अर्जाची फी

200 रुपये

आॅनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख

21 जुलै 2019

मुलाखतीचं ठिकाण

आर्मी हाॅस्पिटल, दिल्ली

अर्ज करण्यासाठी https://amcsscentry.gov.in/doc/signup या लिंकवर क्लिक करा. सैन्यात डाॅक्टर म्हणून काम करण्याची ही चांगली संधी आहे.

दरम्यान, लष्कर वेगवेगळ्या भरतीची अनाउन्समेंट करत असतं. सैन्यात अधिकाऱ्यांची कमतरता जाणवतेय. म्हणूनच नवं पाऊल उचललं जाणार आहे. नव्या पॅकेजची तयारी पूर्ण झालीय. मिळालेल्या माहितीनुसार 10 वर्ष काम करून लष्कराची सेवा सोडणाऱ्या अधिकाऱ्यांना 17 लाख रुपये मिळणार. तर 14 वर्ष सेवाकाळ पूर्ण केला तर 38 लाख रुपये दिले जातील.

नव्या पॅकेजप्रमाणे दर वर्षी दोन महिन्यांचा जादा पगार जोडून वर्षाच्या शेवटी दिला जाईल. सुरुवातीला 10 वर्षांपर्यंत प्रत्येक वर्षी दोन महिन्यांचा पगार आणि शेवटच्या 4 वर्षांत 4 महिन्यांचा पगार दिला जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार शाॅर्ट सर्विस कमिशनप्रमाणे अधिकाऱ्यांची 20 वर्ष पूर्ण होतील आणि त्यांना निवृत्ती वेतन मिळेल, यासाठी त्यांना डिफेन्स सिक्युरिटी काॅर्प्स किंवा नॅशनल कॅडट काॅर्प्समध्ये पाठवलं जाईल. हे व्यावसायिक अभ्यासक्रम करण्यासाठी पेड स्टडी लिव्ह आणि इतर सुविधांचा विचार केला जाईल.'

रिक्षाचालकाने पॅन्टने साफ केली रस्त्यावर पडलेली रेती, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2019 07:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...