नव्या जमान्याची ही बँक होणार बंद, तुमचं खातं असेल तर त्वरित काढा पैसे

नव्या जमान्याची ही बँक होणार बंद, तुमचं खातं असेल तर त्वरित काढा पैसे

या बँकेने आपल्या ग्राहकांना 20 जुलै 2019 रोजी एक संदेश दिला होता. जे पेमेंट बँकेचे ग्राहक आहेत त्यांनी आपला बॅलन्स लवकरात लवकर ट्रान्सफर करावा, असं बँकेने म्हटलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : आयडिया पेमेंट बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. आदित्या बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक त्यांचा कारभार बंद करणार आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, रिझर्व्ह बँकेने आयडिया पेमेंट बँकेला आपला कारभार संपवण्यासाठीची परवानगी दिली आहे.

यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेने आपला कारभार संपवण्याची घोषणा केली होती. काही आकस्मिक घटनांमुळे हा निर्णय घ्यावा लागतो आहे, असं या बँकेने म्हटलं होतं.

एप्रिल 2016 मध्ये आयडिया सेल्युलरने आयडिया मोबाइल कॉमर्स सर्व्हिसेस ही कंपनी पेमेंट बँकेत विलीन केली आणि त्याला आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँक असं नाव दिलं. आता ही पेमेंट बँक बंद झाल्यानंतर एअरटेल, पेटीएम, जिओ, इंडिया पोस्ट यासारख्या प्रमुख कंपन्यांची पेमेंट बँक सेवा उपलब्ध असेल.

20 जुलैला दिला होता संदेश

बँकेने आपल्या ग्राहकांना 20 जुलै 2019 रोजी एक संदेश दिला होता. जे पेमेंट बँकेचे ग्राहक आहेत त्यांनी आपला बॅलन्स लवकरात लवकर ट्रान्सफर करावा, असं बँकेने म्हटलं होतं. आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँक17 महिन्यांच्या आधी एप्रिल 2016 मध्ये सुरू झाली होती. आदित्य बिर्ला नुवो आणि आयडिया सेल्युलर यांचा हा संयुक्त उपक्रम होता. यामध्ये आदित्य बिर्ला नुवोची 51 टक्के भागीदारी आहे. या बँकेला 2015 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पेमेट बँकेचं लायसन्स मिळालं होतं.

(हेही वाचा : IT क्षेत्रात 40 हजार नोकऱ्या जाण्याची शक्यता, या दिग्गजांनी दिले संकेत)

================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: November 19, 2019, 3:30 PM IST
Tags: bankmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading