Home /News /money /

Adani Wilmar IPO: ग्रे मार्केटमध्ये IPO चा भाव वधारला, कंपनीबद्दल वाचा सविस्तर

Adani Wilmar IPO: ग्रे मार्केटमध्ये IPO चा भाव वधारला, कंपनीबद्दल वाचा सविस्तर

अदानी विल्मरने (adani wilmar ipo) सुरुवातीला 4500 कोटी रुपयांचा IPO आणण्याची योजना आखली होती परंतु नंतर ती कमी करून 3600 कोटी रुपये केली. कंपनीने सांगितले की IPO मध्ये पूर्णपणे फ्रेश इश्यू असेल. IPO मधून जमा होणारा निधी कंपनीच्या व्यवसायासाठी वापरला जाईल, असे अदानी विल्मरचे म्हणणे आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 23 जानेवारी : नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणखी एक IPO तुम्हाला कमाईची संधी देऊ शकतो. अदानी विल्मर IPO (Adani Wilmar IPO) 27 जानेवारी 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. हा IPO 31 जानेवारी 2022 रोजी बंद होईल. कंपनीने या इश्यूची किंमत 218-230 रुपयांपर्यंत निश्चित केली आहे. या IPO च्या माध्यमातून कंपनी 3600 कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओ सुरू होण्यापूर्वीच ग्रे मार्केटमध्ये त्याच्या किमती चढू लागल्या आहेत. बाजार तज्ज्ञांच्या मते, आज ग्रे मार्केटमध्ये अदानी विल्मरच्या शेअरची किंमत 65 टक्क्यांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. याचा अर्थ असा की ग्रे मार्केट हा स्टॉक शानदार प्रीमियमवर लिस्टिंग करण्याची शक्यता वाढते. अदानी विल्मर ही FMCG फूड कंपनी आहे. या IPO चा लॉट साइज 65 शेअर्सचा असेल. या IPO मध्ये किमान एक लॉट आणि जास्तीत जास्त 13 लॉट गुंतवले जाऊ शकतात. याचा अर्थ या IPO मध्ये किमान 14,950 रुपये ( 230 x 65) आणि कमाल 1,94,350 रुपयांची [( ₹ 230 x 65) x 13] गुंतवणूक करता येईल. Mutual Fund SIP : दरमाह 1000 रुपये वाचवा आणि बना कोट्यधीश, छोट्या गुंतवणुकीत कमाईची संधी अदानी विल्मर कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, अदानी विल्मारच्या आयपीओची इंटिमेशन 2 ऑगस्ट 2021 रोजी देण्यात आली होती. त्यानंतर अदानी एंटरप्रायझेसने 19 जानेवारी 2022 रोजी SEBI कडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस सादर केला आणि 20 जानेवारी रोजी त्याला मान्यता मिळाली. अदानी समूहाची कंपनी (Adani Group) अदानी विल्मर ही एफएमसीजी क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. ही कंपनी फॉर्च्युन (Fortune) या ब्रँडच्या नावाने खाद्यतेल, मैदा आणि तांदूळ यांसारख्या उत्पादनांचा व्यवसाय करते. अदानी विल्मर हा सिंगापूरचा विल्मर समूह आणि भारताचा अदानी समूह यांच्यातील 50-50 टक्के भागीदारी असलेला संयुक्त उपक्रम आहे. अदानी समूहाच्या 6 कंपन्या लिस्ट आहेत. अदानी विल्मर ही लिस्ट होणारी सातवी कंपनी आहे. IPO साईज कमी केला अदानी विल्मरने सुरुवातीला 4500 कोटी रुपयांचा IPO आणण्याची योजना आखली होती परंतु नंतर ती कमी करून 3600 कोटी रुपये केली. कंपनीने सांगितले की IPO मध्ये पूर्णपणे फ्रेश इश्यू असेल. IPO मधून जमा होणारा निधी कंपनीच्या व्यवसायासाठी वापरला जाईल, असे अदानी विल्मरचे म्हणणे आहे. IPO मधून मिळालेल्या रकमेपैकी 1,900 कोटी रुपये भांडवली खर्चासाठी वापरले जातील. 1100 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि 500 ​​कोटी रुपये अधिग्रहण आणि गुंतवणुकीसाठी वापरले जातील. कर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी Financial Tips, वाचा सोप्या टिप्स सर्वात मोठे डिस्ट्रिब्युशन नेटवर्क अदानी विल्मरच्या वेबसाइटनुसार, कंपनीकडे खाद्यतेलाच्या बाजारपेठेत सर्वात मोठे डिस्ट्रिब्युशन नेटवर्क आहे. त्याचे देशभरात 85 स्टॉक पॉइंट आणि 5000 डिस्ट्रिब्युटर्स आहेत. किरकोळ बाजारात अदानी विल्मरचा हिस्सा 10 टक्के आहे. त्याचे उत्पादन देशभरातील सुमारे 15 लाख रिटेल आउटलेटवर उपलब्ध आहे. कंपनीने स्पेशल तेल Rice Bran and Vivo देखील लाँच केले. कंपनीचा आणखी एक तेल ब्रँड Rupchanda बांगलादेशातील बाजारपेठेत आघाडीवर आहे. कंपनीचे तेथे दोन मोठे रिफायनरीही आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या