मुंबई विमानतळाचा कारभार जाणार अदानी समूहाकडे?

मुंबई विमानतळाचा कारभार जाणार अदानी समूहाकडे?

देशातल्या सर्वांत मोठ्या विमानतळांपैकी एक असणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकी अदानी समूहाकडे जाण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट : देशातल्या सर्वांत मोठ्या विमानतळांपैकी एक असणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकी अदानी समूहाकडे जाण्याची शक्यता आहे. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL)  या कंपनीकडे सध्या मुंबई विमानतळाचा कारभार आहे. त्याचा 74 टक्के हिस्सा आता अदानींकडे येण्याची शक्यता आहे.

MIAL मध्ये GVK ग्रूपचा सर्वाधिक आहे. आता GVK कडचा 50 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा गौतम अदानी ग्रूप खरेदी करणार आहे. याशिवाय छोट्या भागिदारांकडूनही अदानी त्यांचे हक्क विकत घेईल आणि त्यांच्याकडे 74 टक्क्यांची मालकी येईल. सध्या MIAL कडे मुंबई विमानतळाची देखभाल तसंच अद्याप पूर्ण झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची जबाबदारीही आहे.

मोदी सरकारने याअगोदरच जयपूर, तिरुवनंतपुरम, अहमदाबाद, लखनौ, मंगळुरू आणि गुवाहाटी विमानतळं याधीच अदानी ग्रूपकडे PPP (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर चालवायला दिलेली आहेत. त्यात आता मुंबई आणि होऊ घातलेल्या नवी मुंबई विमानतळाचंही काम अदानी समूहाकडे जाईल.

GVK समूह सध्या आर्थिक अडचणींशी सामना करत आहे. त्यामुळे आता MIAL ची देणी या नव्या व्यवहारातून मोकळी होऊ शकतील. COVID-19 च्या साथीमुळे विमानतळांचं आर्थिक गणित कोलमडून पडलं आहे. त्यामुळे अदानी उद्योगसमूहाला GVK आपला हिस्सा विकायला तयार आहे, अशी बातमी मनी कंट्रोलने दिली आहे.

हा व्यवहार पूर्ण होईल तेव्हा, भारतात विमानतळांची जबाबदारी असणारा सर्वात मोठा खासगी उद्योग म्हणून अदानी उद्योगसमूहाचं नाव घेतलं जाईल. सध्या GMR ग्रूपकडे दिल्ली आणि हैदराबादच्या विमानतळांची जबाबदारी आहे. त्यांच्यानंतरची महत्त्वाची एअरपोर्ट अदानींकडे आहेत.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 24, 2020, 3:45 PM IST

ताज्या बातम्या