मराठी बातम्या /बातम्या /मनी /कोरोना काळात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, लग्नसराईच्या काळातही भारतात मागणी घटली

कोरोना काळात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, लग्नसराईच्या काळातही भारतात मागणी घटली

कोरोना काळात (Coronavirus) आर्थिक स्तरावरील अस्थीर पार्श्वभूमीवर लोकांनी खर्चाऐवजी बचतीवर भर दिला त्यामुळं अनेक उत्पादनांची मागणी घटली. सोन्याचाही यात समावेश आहे.

कोरोना काळात (Coronavirus) आर्थिक स्तरावरील अस्थीर पार्श्वभूमीवर लोकांनी खर्चाऐवजी बचतीवर भर दिला त्यामुळं अनेक उत्पादनांची मागणी घटली. सोन्याचाही यात समावेश आहे.

कोरोना काळात (Coronavirus) आर्थिक स्तरावरील अस्थीर पार्श्वभूमीवर लोकांनी खर्चाऐवजी बचतीवर भर दिला त्यामुळं अनेक उत्पादनांची मागणी घटली. सोन्याचाही यात समावेश आहे.

नवी दिल्ली, 29 जानेवारी : कोरोना विषाणूच्या साथीमुळं (Coronavirus Pandemic) जगभरात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, कोट्यवधी लोकांचा रोजगार बंद झाला, यामुळं अर्थव्यवस्था (Economy) ढासळली आहे. या अस्थीर पार्श्वभूमीवर लोकांनी खर्चाऐवजी बचतीवर भर दिला त्यामुळं अनेक उत्पादनांची मागणी घटली. सोन्याचाही यात समावेश आहे. जागतिक सुवर्ण परिषदेनं (World Gold Council) दिलेल्या माहितीनुसार, 2020 मधील जगभरातील सोन्याची मागणी (Gold Demand) एका दशकातील मागणीपेक्षा कमी झाली आहे. जगातील सर्वांत मोठा सोने आयातदार देश असलेल्या भारतातही सोन्याच्या मागणीत मोठी घट दिसून आली.

2020 मध्ये भारतात फक्त 446 टन सोन्याची मागणी

जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार, भारतात (India) 2020 मध्ये सोन्याच्या मागणीत तब्बल 35.34 टक्के घट झाली. या काळात भारतात केवळ 446.4 टन सोन्याची आयात झाली. 2019 मध्ये ही मागणी 690 टनांहून अधिक होती. कोरोना संकटाच्या काळात ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली. त्यानंतर सोन्याच्या दरात चढ-उतार होत राहिले. यामुळं भारतात सोन्याची मागणी कमी झाली. सध्या सोन्याचा भाव ऑगस्टमधील दरापेक्षा सात हजार रुपये कमी आहे. त्यामुळं आता सोन्याची मागणी वाढेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

(हे वाचा-MMRC RECRUITMENT: मेट्रोमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख)

आर्थिक संकटांमुळे कमी झाली खरेदी

भारतात सणसमारंभ किंवा शुभ मुहूर्तावर सोने खरेदीची प्रथा आहे, मात्र कोरोना संकटामुळं निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळं लोकांनी सोने खरेदीकडं पाठ फिरवली होती. त्यामुळं सोन्याच्या मागणीत मोठी घट झाली. देशात गेल्या वर्षी 1 लाख 88 हजार 280 कोटी रुपये किंमतीच्या सोन्याची आयात झाली. 2019 मध्ये हे प्रमाण 2 लाख 17 हजार 770 कोटी रुपये होते. मुल्याच्या पातळीवर सोन्याच्या मागणीत 14 टक्के घट नोंदवण्यात आली.  सोन्याच्या दागिन्यांच्या (Gold Jewellery) मागणीतही मुल्याच्या पातळीवर 42 टक्के घट झाली. या काळात दागिन्यांची मागणी 315 .9 टन होती, 2019 मध्ये हेच प्रमाण 544.6 टन होतं.

(हे वाचा-EMI फेडण्यासाठी या बँकेच्या ग्राहकांना शाखेत जाण्याची गरज नाही, ही मिळणार सुविधा)

कोरोनामुळं लागू करण्यात आलेला लॉकडाऊन दूर झाल्यानंतर परिस्थिती सुधारली तशी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत सोन्याची मागणी वाढल्याचं दिसून आलं. 2019 मधील याच कालावधीतील सोन्याच्या मागणीच्या तुलनेत 19 टक्के वाढ दिसून आली. 2020च्या चौथ्या तिमाहीत 186.2 टन सोनं आयात (Gold Import) करण्यात आलं. 2020मध्ये संपूर्ण जगभरात 3759.6 टन सोन्याची मागणी होती, 2019 मध्ये हेच प्रमाण 4386.4 टन होते.

First published:

Tags: Gold