नवी दिल्ली, 08 सप्टेंबर : फिच रेटिंग्जने (Fitch Rating) चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 10.5 टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज वर्तवला आहे. चालू वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये (एप्रिल ते जून) भारताच्या जीडीपीमध्ये 23.9 टक्क्यांची घसरण झाली आहे. पहिल्या तिमाहीमध्ये जीडीपी ग्रोथ रेट -23.9 टक्के नोंद झाला आहे. जगभरातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये अमेरिकेनंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा परफॉर्मन्स अत्यंत खराब राहिला आहे. गेल्या 40 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आलेली ही सर्वात मोठी घसरण आहे.
कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात जवळपास 2 महिन्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. अद्यापही काही ठिकाणी सर्व सेवा सुरू झालेल्या नाहीत. यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. याआधीच असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता की जीडीपीमध्ये डबल डिजिटमध्ये घसरणीची नोंद होईल. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) च्या आकडेवारीनुसार मागील आर्थिक वर्ष 2019-20 च्या पहिल्या तिमाहीमध्ये जीडीपी ग्रोथ रेट 5.2 टक्के होता. अधिकांश रेटिंग एजन्सीजनी चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये जीडीपीमध्ये मोठी घसरण होईल असा अंदाज व्यक्त केला होता.
(हे वाचा-यावर्षी SBI देणार 14000 जणांना नोकरीची संधी, वाचा काय आहे योजना)
कोरोनाच्या संकटकाळात देशामध्ये सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. हा काळ अर्थव्यवस्थेच्या घसरणीसाठी सर्वाधिक जबाबदार मानला जात आहे.
फिच रेटिंग्जने मंगळवारी अशी माहिती दिली की, चालू आर्थिक वर्षातील तिसरीति तिमाही अर्थात ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये जीडीपीमध्ये सुधारमा दिसेल. मात्र याबाबत असे स्पष्ट संकेत आहेत की, अर्थव्यवस्थेतील सुधारणा धीम्या गतीने होतील. फिचच्या मते चालू आर्थिक वर्षातील जीडीपी -10.5 टक्के राहिल.
(हे वाचा-अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी तातडीने ही पाऊलं उचला; रघुराम राजन यांचा मोठा सल्ला)
जूनमध्ये जाहीर झालेल्या जागतिक आर्थिक परिस्थितीच्या तुलनेत भारताच्या अर्थव्यवस्थेतील घसरणीच्या अंदाजात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. फिचने यापूर्वी चालू आर्थिक वर्षात भारताच्या जीडीपीत पाच टक्क्यांची घसरण वर्तविली होती.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सरकारने 25 मार्चपासून देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली. 20 एप्रिलनंतर केंद्र सरकारने ठराविक आर्थिक कामांमध्ये लॉकडाउन शिथिल करण्यास सुरवात केली होती. 2019-20 या आर्थिक वर्षात विकास दर 4.2 टक्के होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus