नवी दिल्ली, 17 जून: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये (
Second Wave of Coronavirus) नोकरी गमावणाऱ्यांमध्ये (
Job Losses) सर्वाधिक कर्मचारी हे तरुण आहेत किंवा अगदी जुने कर्मचारी आहेत. फार्च्यून 500 (
Fortune 500) लिस्टच्या कंपन्यांमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार ही माहिती समोर आली आहे. भारतात एप्रिल 2021 दरम्यान 2000 लोकांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला आहे.
फायनान्शिअल टेक्नॉलॉजी कंपनी एफआयएस (
FIS) द्वारे करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये 55 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या 6 टक्के कर्मचाऱ्यांची नोकरी स्थायी स्वरुपात गेली आहे. गेल्यावर्षी हा आकडा 4 टक्के होता. तर 24 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या फ्रेशर्समध्ये 11 टक्के लोकांनी स्थायी स्वरुपात नोकरी गमावली आहे. गेल्यावर्षी ही आकडेवारी 10 टक्के होती.
1 कोटींहून अधिकांनी गमावली नोकरी
भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (
CMII) ने मेमध्ये असे म्हटले होते की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशामध्ये 1 कोटीपेक्षी अधिक भारतीयांनी नोकरी गमावली आहे. बेरोजगारी दर 12 महिन्यातील सर्वोच्च आहे. हा दर 12 टक्के एवढा झाला आहे.
हे वाचा-सोन्याच्या दागिन्यांबाबत महत्त्वाचे, या नियमानंतर तुमच्या ज्वेलरीचं काय होणार?
सर्वेक्षणानुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत काही वयोगटातील व्यक्तींनी यावर्षी सर्वाधिक नोकऱ्या गमावल्या आहेत. या दरम्यान 18 ते 24 वयोगटातील 9 टक्के कर्मचाऱ्यांना अस्थायी स्वरुपात कामावरुन कमी करण्यात आले आहे. गेल्यावर्षी या वयोगटात अस्थायी स्वरुपात नोकरी जाण्याचं प्रमाण 21 टक्के होतं. तर 55 पेक्षा अधिक वय असणाऱ्या 7 टक्के लोकांची नोकरी अस्थायी स्वरुपात गेली आहे, गेल्यावर्षी हा आकडा 13 टक्के होता.
हे वाचा-LIC CSL ने लाँच केलं 'शगुन' गिफ्ट कार्ड, 10000 रुपयांपर्यंत करता येईल शॉपिंग
कंपनीने अशी माहिती दिली आहे की 18 ते 24 वयोगटातील 38 टक्के तरुणांनी असे म्हटले आहे की त्यांनी 12 महिन्यात फसवणूक अनुभवली आहे. तर 25 ते 29 वयोगटाील 41 टक्के कर्मचाऱ्यांनी फसवणुकीचा सामना केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.