CORONAVIRUS मुळे खिशाला चाप, मोबाईल, टीव्ही, फ्रिज आणि एसी महागणार

CORONAVIRUS मुळे खिशाला चाप, मोबाईल, टीव्ही, फ्रिज आणि एसी महागणार

मार्चमध्ये फ्रिज, एसी त्याचप्रमाणे टिव्ही सेटच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामागचं महत्त्वाचं कारण CORONAVIRUS आहे.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : डिसेंबर-जानेवरीमध्ये काहीसा गारठलेला मुंबईकर पुन्हा एकदा उकाड्यामुळे हैराण झाला आहे. महाराष्ट्रात इतर ठिकाणीही थंडीचा जोर ओसरू लागला आहे. मार्च येईपर्यंत चांगलाच उकाडा जाणवू लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यादरम्यान रेफ्रिजेटर आणि एअर कंडिशनरच्या खरेदीमध्ये वाढ होते. मात्र तुम्ही फ्रिज किंवा एसी घेण्याचा विचार करण्यात असाल तर लवकरात लवकर खरेदी करा. कारण मार्चमध्ये फ्रिज, एसी त्याचप्रमाणे टिव्ही सेटच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या वस्तू महाग होण्याचं महत्त्वाचं कारण CORONAVIRUS आहे. कारण चीनमधून येणाऱ्या कंपोनंट्स आणि फिनीश्ड प्रोडक्ट्सच्या आयातीवर कोरोना व्हायरसमुळे परिणाम झाला आहे. या प्रोडक्ट्सची आयात मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक कंपन्यांकडून डिस्काउंट आणि प्रमोशनल ऑफर्स रद्द करण्यात येत आहेत, त्यामुळे ग्राहकांना या वस्तू खरेदी करताना 3 ते 5 टक्के ज्यादा रक्कम द्यावी लागणार आहे. टीव्हीसारख्या अनेक वस्तूंची किंमत 7 ते 10 टक्क्यांनी वाढू शकते.

(हेही वाचा-चिकन खाल्यामुळे कोरोनो होतो अशी अफवा पसरवून फसले, राज्य सरकारने दिला झटका)

चीनमधून येणारा माल भारतात पोहोचण्यात उशीर होत आहे. त्यामुळे वस्तूंच्या किंमती 3 ते 5 टक्क्यांनी वाढणं निश्चित आहे. वस्तुंच्या पुरवठ्यामध्ये अडथळा येत असल्यामुळे डिस्काउंट किंवा ऑफर देणं कंपन्यांना शक्य होत नाही आहे. टेलिव्हिजन किंवा एसी-फ्रिजप्रमाणेच स्मार्टफोन इंडस्ट्री एक्सपर्ट्सकडूनही डिस्काउंट्स आणि ऑफर्स कमी होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या स्मार्टफोन्सचा पुरवठा नियंत्रणात येईपर्यंत काही मॉडेल्सच्या किंमतीमध्ये वाढ होऊ शकते. चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे दळणवळणार अनेक ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. चीनी नववर्षाच्या मोठ्या सुट्टीनंतर सुद्धा अनेक कामगार कारखान्यांमध्ये पोहचू शकत नाही आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कमीत कमी 3 आठवड्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.

आयफोनचा पुरवठा घटला

जगभरात अॅपलच्या पुरवठ्यावर अनिश्चित काळासाठी परिणाम होणार आहे. कारण iPhoneचे चीनमधील मॅन्युफॅक्सचरिंग पार्टनर्सकडून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अॅपलकडून सोमवारी रिवाइज्ड इनव्हेस्टर गाइडन्स जारी करण्यात आले. त्यात ही माहिती देण्यात आली होती. भारतामध्ये आयफोनच्या पुरवठ्याची कमी पुढील महिन्यापर्यंत जाणवून शकते. त्यामुळे अनेक स्टोअर्स आणि ई-कॉमर्स साईट्सवर आयफोनवर डिस्काउंट किंवा ऑफर मिळण्याची शक्यता कमी आहे.

First published: February 20, 2020, 2:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या