नवी दिल्ली, 7 जून : रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) डिजिटल युनिट जिओ प्लॅटफॉर्मला सातवा गुंतवणूकदार मिळाला आहे. फेसबुक आणि इतर मोठ्या गुंतवणूक कंपन्यांनंतर आता अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीने (ADIA) देखील जिओ प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
एडीआयए ही कंपनी जियो प्लॅटफॉर्ममधील 1.16 टक्के भागभांडवलसाठी 5,683.50 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीसह आता जिओ प्लॅटफॉर्ममधील एकूण गुंतवणूक 97,885.65 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
शुक्रवारी (5 जून) सिल्व्हर लेक पार्टनर्सनी अतिरिक्त 0.93 टक्के भागभांडवलासाठी 4,546.80 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आहे. मेच्या सुरुवातीच्या काळातही सिल्व्हर लेकने 1.15 टक्के भागभांडवलसाठी 5,655.75 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. शुक्रवारीच अबू धाबी स्थित गुंतवणूक कंपनी मुबाडला यांनी 1.85 टक्के भागभांडवल 9,093.60 कोटी रुपयांना खरेदी केली. एडीआयएने जिओ प्लॅटफॉर्मचे इक्विटी मूल्य 4.91 लाख कोटी रुपये आणि एंटरप्राइझ मूल्य 5.16 लाख कोटी रुपयांचे असेल असा अंदाज वर्तविला आहे.
हे वाचा-मोठी बातमी! या तारखेपासून सुरू होणार देशातील शाळा आणि महाविद्यालये
राज्यातील पहिली मोठी कारवाई, भीती दाखवून अॅडमिट करणाऱ्या रुग्णालयाला दणका
'कोरोनाचा लढा' हा राजकारणाचा विषय नाही, गिरीश महाजन यांचा शिवसेनेला टोला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.