• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Aadhar Card वरील फोटो आवडत नाही का? अशाप्रकारे लगेच करा बदल

Aadhar Card वरील फोटो आवडत नाही का? अशाप्रकारे लगेच करा बदल

How to change photo on Aadhar Card: आधार कार्ड हे असे कागदपत्र आहे की जे तुम्हाला विविध कामांसाठी आवश्यक आहे. अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधारची आवश्यकता भासू शकते. दरम्यान या आधार कार्डावर तुमचा असणारा फोटो तुम्ही बदलू शकता.

 • Share this:
  नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर: भारतातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या ओळखीसाठी आधार कार्ड (Aadhaar Card Importance) अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. केंद्र सरकारकडून भारताच्या नागरिकाला हा 12 अंकी विशिष्ट ओळख क्रमांक जारी केला जातो. ज्यामध्ये संबधित व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, फोटो आणि बायोमेट्रिक तपशील इ. माहिती असते. सर्व सरकारी ते खाजगी संस्थामध्ये विविध कारणांसाठी आधार कार्डची आवश्यकता भासते. दरम्यान काही वेळा असं होतं की अनेकांना त्यांच्या आधार कार्डावरील फोटो आवडत नाही. अनेकदा सोशल मीडियावर याबाबत मीम देखील शेअर केले जातात, आधार कार्डवरील फोटोंची खिल्ली उडवली जाते. तुम्हाला देखील तुमचा आधार कार्डावरील फोटो (How to Change photo on aadhaar card) आवडत नसेल आणि तो बदलण्याची तुमची इच्छा असेल तर ते शक्य आहे. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही हे काम पूर्ण करू शकता. हे वाचा-या तारखेला बँक ऑफ बडोदा विकतेय स्वस्त प्रॉपर्टी, खरेदी करा तुमचं स्वत:चं घर तुम्हाला फोटोग्राफ अपडेट करण्याची प्रक्रिया ऑफलाइन पूर्ण करावी लागेल. याकरता ऑनलाइन सुविधा देण्यात आलेली नाही. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आधार कार्ड धारकांना त्यांचा आधार कार्डावरील फोटो अपडेट करण्याची परवानगी देतं. तुम्ही जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. जाणून घ्या काय आहे आधार कार्डवरील फोटो बदलण्याची सोपी प्रक्रिया काय आहे आधार कार्डावरील फोटो बदलण्याची प्रक्रिया -सर्वात आधी तुम्हाला UIDAI ची वेबसाइट uidai.gov.in यावर लॉग इन करावं लागेल आणि आधार नोंदणी फॉर्म डाऊनलोड करावा लागेल -हा फॉर्म भरून तुम्ही जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जा, त्याठिकाणी हा फॉर्म जमा करावा लागेल -त्याठिकाणी आधार नोंदणी केंद्रावरील कर्मचारी तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स घेतील हे वाचा-Petrol Price: सलग तिसऱ्या दिवशी वधारले इंधनाचे दर, मुंबईत पेट्रोल 108 रुपयांपार -त्यानंतर त्यांच्याकडून फोटो देखील घेतला जाईल -त्यानंतर आधार केंद्रावरील कर्मचारी शुल्क स्वरुपात 25+जीएसटीची रक्कम घेऊन तुमचा फोटो आधार कार्डावर अपडेट करेल. -याठिकाणी कर्मचाऱ्याकडून तुम्हाला यूआरएन (URN) सह एक स्लिप देखील मिळेल -तुम्ही या URN चा वापर करून तुमचा फोटो बदलला आहे की नाही तपासता येईल -आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर नवीन फोटोसह तुम्ही अपडेटेड आधार कार्ड UIDAI च्या वेबसाइटच्या माध्यमातून डाउनलोड करू शकता.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: