मुंबई, 11 मे : तुम्हाला आधार कार्डावरच्या माहितीत काही बदल करायचा असेल किंवा आधार कार्ड जनरेट करायचं असेल तर आता जास्त पैसे द्यावे लागतील. आधार कार्ड देणाऱ्या UIDAIनं आधारवर चार्जेबल सर्विसेसचे पैसे वाढवलेत. 1 जानेवारी 2019पासून हे पैसे वाढवलेत. आधार अॅथाॅरिटी यूआयडीएआयनं ट्विट करून ही माहिती दिलीय. पाहा कुठल्या सेवेसाठी किती पडणार पैसे?
आधार कार्ड तयार करताना - तुम्ही पहिल्यांदाच आधार कार्ड तयार करत असाल तर तुम्हाला कुठलेच पैसे पडणार नाहीत. ते मोफत आहे.
'या' म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणं आहे धोकादायक,अशी घ्यावी काळजी
बायोमॅट्रिक अपडेट - तुम्ही तुमच्या अपत्याचा मॅनडेटरी बायोमॅट्रिक अपडेट करणार असाल, तर तो मोफत आहे. त्याला काही पैसे लागणार नाहीत.
आजारी असूनही लावली निवडणूक ड्युटी, महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू
नावात बदल - आधार कार्डावर तुमचं नाव, पत्ता, मोबाइल, ई मेल आणि बायोमेट्रिक अपडेशन यासाठी तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील.
लादेनचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेनं वापरलेलं हेलिकॉप्टर आता भारताकडे
कलर प्रिंट आउट- eKYCद्वारे आधार सर्च, फाइंड आधार किंवा इतर काही आणि A4 प्रिंटसाठी 30 रुपये पडतील.
इथे करा तक्रार - तुमच्याकडून कुणी अवैध पैसे घेत असेल तर तुम्हाला तक्रार करायला हवी. यासाठी टाॅल फ्री नंबर आहे 1947. शिवाय तुम्ही help@uidai.gov.in इथे ई मेल करू शकता.
VIDEO: बंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग