पीव्हीसी आधार कार्ड कसे बनवायचे? त्यासाठी UIDAI वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्ही 'My Aadhar' विभागात जा आणि 'Order Aadhar PVC Card' वर क्लिक करा. यानंतर, आपल्याला आपला 12 क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी आधारचा आधार एनरोलमेंट आयडी (EID) भरावा लागेल. यानंतर, आपल्याला सिक्युरिटी कोड किंवा कॅप्चा दिसेल ते आपल्याला भरावे लागेल. ते भारल्यावर 'Send OTP' चे ऑप्शन ऍक्टिव्ह होईल. त्यावर क्लिक केल्यावर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर एक OTP येईल. ते OTP आपण भरल्यानंतर आपले फॉर्म सबमिट करू शकतो. या संपूर्ण प्रक्रियेनंतर, आपल्या समोरच्या स्क्रीनवर आपल्याकडे पीव्हीसी आधार कार्डचे प्रिव्यु असेल आणि त्या खाली पेमेंट पर्याय देखील दिसतील. त्यावर क्लिक करून, आपण पेमेंट मोडमध्ये जाल. इथे तुम्हाला 50 रुपये फी भरावी लागेल. यानंतर, आपल्या आधार पीव्हीसी कार्डची ऑर्डर प्रक्रिया पूर्ण होईल. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, UIDAI आधार प्रिंट करेल आणि 5 दिवसात भारतीय पोस्टला सुपूर्त करेल. यानंतर, पोस्टल विभाग स्पीड पोस्टच्या माध्यमातून ते आपल्या घरात पोहोचवेल.#AadhaarPVCcard Your identity is verifiable instantly by scanning the QR code on your new Aadhaar PVC card. Click on the link https://t.co/TVsl6Xh1cX to order your Aadhaar PVC card now. #OrderAadhaarOnline pic.twitter.com/kBnhGRyzk4
— Aadhaar (@UIDAI) November 6, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.