Home /News /money /

आधार क्रमांक फसव्या व्यक्तीच्या हाती लागल्यास तो खात्यातून पैसे काढू शकेल? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं

आधार क्रमांक फसव्या व्यक्तीच्या हाती लागल्यास तो खात्यातून पैसे काढू शकेल? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं

आधार कार्ड (Aadhaar Card) सध्या एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. दरम्यान आधार कार्ड संबंधित काही फ्रॉड देखील समोर येत आहेत

    नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : आधार कार्ड (Aadhaar Card) सध्या एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. दरम्यान आधार कार्ड संबंधित काही फ्रॉड देखील समोर येत आहेत, कारण आधार असे डॉक्यूमेंट आहे जे तुमचे पॅन कार्ड, बँक आणि अन्य काही ठिकाणी लिंक करण्यात आलेले असते.  UIDAI (Unique identification authority of India)ने आधारशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. प्रश्न- एखाद्या फसवणूक करणाऱ्याच्या हातात माझे आधार कार्ड लागले आणि त्याने माझ्या नावाने खाते उघडण्याचा प्रयत्न केला, तर माझे काय नुकसान होईल? उत्तर- काही नाही. सरकारी नियमांनुसार अन्य काही कागदपत्रांबरोबर आधार कार्डच्या माध्यमतून बँक खाते काढण्यात येते. मात्र आधार कार्ड मिळाल्यानंतर बँकाना खाते उघण्यासाठी पूर्ण प्रक्रिया करावी लागते आणि व्हेरिफिकेशन पूर्ण करावे लागते. अशावेळी एखादा फसवणूक करणारा व्यक्ती केवळ आधार कार्ड घेऊन गेला तर तुमच्या नावाने खाते नाही उघडू शकत. जर असे झाले तर ती बँकेची चूक असेल, आधार कार्डधारकाची नाही. प्रश्न- ज्या लोकांबरोबर फ्रॉड झाला आहे, त्यांची काय चूक आहे? उत्तर- साधारणपणे फ्रॉड करणारे मोठ्या रकमेच्या लालसा किंवा कार्ड  ब्लॉक झाले आहे असे सांगून तुमची वैयक्तिक माहिती मागून घेतात. ज्यामध्ये जन्मतारीख, पॅन कार्डची माहिती, युजर आयडी, ओटीपी, पासवर्ड, पिन यांसारखी कोणतीही माहिती त्यांच्याकडून मागण्यात येते. (हे वाचा-200 अब्ज डॉलर मार्केट कॅप गाठणारी रिलायन्स पहिली कंपनी, शेअर रेकॉर्ड नवीन उंचीवर) बँकेची अधिकारी अशाप्रकारे कोणतीही माहिती विचारत नाही. अशाप्रकारे अनोळखी व्यक्तींना माहिती दिल्याने नुकसान सहन करावे लागते. बँकेकडून स्पष्ट सांगण्यात येते की कोणत्याही व्यक्तीला तुमचा युजर आयडी, ओटीपी, पासवर्ड, पिन  सांगू नका. यासंदर्भात शंका असेल तर बँकेच्या शाखेशी संपर्क करा. प्रश्न- जर एखाद्या फसव्या व्यक्तीकडे माझ्या बँक खात्याशी लिंक आधार कार्ड क्रमांक असेल तर तो खात्यातून पैसे काढू शकेल का? उत्तर- अजिबात नाही. तुमच्याकडे एखाद्याच्या खाते क्रमांक असण्यासारखे हे आहे. ज्याप्रमाणे एखाद्याचा केवळ खाते क्रमांक असल्यास पैसे नाही काढता येत. त्याचप्रमाणे खात्याशी लिंक आधार कार्ड क्रमांक असला तरी पैसे काढता येत नाहीत. खात्यातून पैसे काढण्यासाठी बँकेची एक प्रक्रिया असते, ज्यामध्ये खातेधारकाला स्वत: बँकेत उपस्थित राहावे लागते किंवा त्याला चेक/विड्रॉल स्लीपवर सही करावी लागते. (हे वाचा-नोकरी गेल्यानंतरही तुमच्या पीएफ खात्यामार्फत होईल कमाई, वाचा नियम व अटी) एटीएम किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शनसाठी पिने, ओटीपी, पासवर्डची आवश्यकता असते. नवीन पासवर्ड किंवा पिनसाठी देखील संपूर्ण माहिती द्यावी लागते. केवळ आधारच्या आधारे पासवर्ड किंवा पिन क्रिएट करता येत नाही. प्रश्न- काय कधी आधार कार्डच्या चुकीच्या वापरामुळे कोणत्याही आधार कार्डधारकाचे आर्थिक नुकसान झाले आहे का? UIDAI च्या वेबसाइटनुसार आधार क्रमांकाच्या मदतीने एखाद्याची ओळख चोरी करून आर्थिक नुकसान पोहोचवल्याची कोणतेही प्रकरण अद्याप समोर आलेले नाही. आधार प्लॅटफॉर्मवर दररोज जवळपास 3 कोटी आधार क्रमांकांना विविध सेवांसाठी प्रमाणित करण्यात येते. त्याचप्रमाणे हा प्लॅटफॉर्म सुरक्षित ठेवण्यासाठी प्रणालीत विविध बदल करण्यात येत आहेत. प्रश्न- जर आधार कार्डाचा चुकीचा वापर शक्य नाही आहे, तर UIDAI नागरिकांना सोशल मीडियावर आधार क्रमांक टाकण्यास मनाई का करते? आधार कार्डचा चुकीचा वापर संभव नाही आहे, मात्र कारणाशिवाय तुमची माहिती सोशल मीडियावर देणे चुकीचे ठरेल. कारण त्यामुळे तुम्ही फसव्या व्यक्तींच्या नजरेत येऊ शकता. यामुळे जरी तुमचे आर्थिक नुकसान नाही झाले, तरी काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Aadhar card

    पुढील बातम्या