मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Aadhaar Card संबंधित समस्या एका कॉलमध्ये सोडवा, जाणून घ्या कोणता आहे क्रमांक

Aadhaar Card संबंधित समस्या एका कॉलमध्ये सोडवा, जाणून घ्या कोणता आहे क्रमांक

सध्याच्या काळात आधार कार्ड (Aadhaar Card Importance) हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज आहे. आधार कार्ड नसल्यास किंवा त्यावरील माहिती अपडेट नसल्यास अनेक कामांचा खोळंबा होऊ शकतो.

  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 30 ऑक्टोबर: सध्याच्या काळात आधार कार्ड (Aadhaar Card Importance) हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज आहे. आधार कार्ड नसल्यास किंवा त्यावरील माहिती अपडेट नसल्यास अनेक कामांचा खोळंबा होऊ शकतो. अशावेळी आधार कार्डविषयी काही समस्या आल्यास तुम्हाला ती समस्या कशी सोडवायची हे माहित असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला आधार कार्डशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर आता फक्त एक नंबर डायल करून त्याचे निराकरण केले जाऊ शकते. आधार कार्डधारकांना आधारशी संबंधित काही समस्या असतील तर तुम्ही 1947 नंबर डायल करून त्या सर्व समस्या दूर करू शकता. UIDAI ने ट्वीट करून या क्रमांकाची माहिती दिली आहे. हा नंबर तुम्हाला 12 भाषांमध्ये मदत करू शकतो. UIDAI ने केलं ट्वीट UIDAI ने ट्वीट केले आहे की, आता आधारशी संबंधित सर्व समस्या एका फोन कॉलवर सोडवल्या जातील. या ट्वीटमध्ये UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार आधार हेल्पलाइन 1947 हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, उडिया, बंगाली, आसामी आणि उर्दू या 12 भाषांमध्ये उपलब्ध आहेत. #Dial1947ForAadhaar वर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाषेत संवाद साधू शकता. हे वाचा-Gold Price Today: दोन दिवसांच्या वाढीनंतर आज सोने दरात घसरण, चांदीचा भावही उतरला एखादा हेल्पलाइन टोलफ्री क्रमांक आठवणं कठीण जाऊ शकतं. पण आधारचा हा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक लक्षात ठेवणं सोपं आहे कारण 1947 हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याचं वर्ष आहे. हा 1947 क्रमांक विनामूल्य आहे जो वर्षभर IVRS मोडवर चोवीस तास उपलब्ध असेल. तसेच या सुविधेसाठी कॉल सेंटरचे प्रतिनिधी सकाळी 7 ते रात्री 11 (सोमवार ते शनिवार) उपलब्ध आहेत. त्याचबरोबर रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रतिनिधी उपलब्ध असतात. हे वाचा-Multibagger Stock : 'या' स्टॉकमुळे वर्षभरात 1 लाखाचे 1.71 कोटी हा हेल्पलाइन क्रमांक लोकांना आधार नोंदणी केंद्रे, नावनोंदणीनंतर आधार क्रमांकाची स्थिती आणि इतर आधारशी संबंधित माहिती देईल. याशिवाय जर कोणाचे आधार कार्ड हरवले असेल किंवा पोस्टाने अद्याप मिळाले नसेल तर या सुविधेच्या मदतीने माहिती मिळवता येईल.
First published:

Tags: Aadhar card, Aadhar card on phone

पुढील बातम्या