Home /News /money /

केवळ 50 रुपयात बनवा एटीएमसारखे दिसणारे Aadhaar PVC card, ऑनलाइन करता येईल हे काम

केवळ 50 रुपयात बनवा एटीएमसारखे दिसणारे Aadhaar PVC card, ऑनलाइन करता येईल हे काम

UIDAI ने आता एटीएम प्रमाणे दिसणारे Aadhaar PVC card जारी केले आहे. हे आधार कार्ड तुम्ही केवळ 50 रुपयात बनवू शकता.

    नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : सध्या आधार कार्ड हे देशातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा दस्तावेज आहे. घरातील काही आर्थिक कामं किंवा सरकारी कामांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. अशावेळी तुमचे आधार कार्ड सुरक्षित असणे आवश्यक आहे. हेच लक्षात घेता UIDAI ने आता एटीएम प्रमाणे दिसणारे Aadhaar PVC card जारी केले आहे. हे कार्ड तुम्ही केवळ 50 रुपयात बनवू शकता. जाणून घ्या हे कार्ड  तुम्ही ऑनलाइन कसे मागवू शकता. UIDAI ने ट्विटरवर दिली माहिती UIDAI ने ट्वीट करून अशी माहिती दिली आहे की, तुम्ही Aadhaar PVC card केवळ 50 रुपयात बनवू शकता. तुम्ही हे कार्ड ऑनलाइन देखील ऑर्डर करू शकता. ऑर्डर केल्याच्या 5 दिवसानंतर कार्ड डिपार्टमेंटकडून तुमच्या घरी पाठवले जाईल. पीव्हीसी कार्ड प्रिंट करण्यासाठी 50 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. पीव्हीसी कार्ड एक प्रकारचे प्लॅस्टिकचे कार्ड असते. कशी कराल ऑनलाइन ऑर्डर? 1. नवीन आधार पीव्हीसी कार्डसाठी तुम्हाला UIDAI च्या वेबसाइटवर जावे लागेल 2. याठिकाणी 'My Aadhaar' सेक्शनमध्ये जाऊन 'Order Aadhaar PVC Card'वर क्लिक करा 3. याठिकाणी तुम्हाला 12 अंकी आधार कार्ड क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्यूअल आयडी किंवा 28 अंकी आधार एनरोलमेंट आयडी टाकावा लागेल. (हे वाचा-मोदी सरकार मास्टरस्ट्रोकच्या तयारीत! चीनच्या दुश्मन देशांशी करणार हातमिळवणी) 4. यानंतर सिक्योरिटी कॅप्चा कोड टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा 5. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइलवर आलेला ओटीपी एंटर करा. 6. यानंतर तुम्हाला आधार पीव्हीसी कार्डाचा प्रीव्ह्यू दिसेल (हे वाचा-कोरोना काळात जगभरातील अर्थव्यवस्थांचं कंबरडं मोडलंय, चीनचा GDP मात्र वधारला) 7. खाली देण्यात आलेल्या पेमेंट करण्याच्या पर्यायावर क्लिक करा 8. पेमेंट पेजवर गेल्यानंतर तुम्हाला 50 रुपये फी भरावी लागेल. 9. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुमच्या आधार पीव्हीसी कार्डाची प्रोसेस पूर्ण होईल 5 दिवसांमध्ये येईल तुमचे आधार पीव्हीसी कार्ड जेव्हा ही प्रोसेस पूर्ण होईल त्यानंतर 5 दिवसांच्या आतमध्ये डिपार्टमेंटकडून भारतीय डाक विभागाकडे कार्ड पाठवले जाईल. पोस्टाच्या माध्यमातून कार्ड तुमच्या घरी पोहोचवले जाईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Aadhar card, Money

    पुढील बातम्या