मराठी बातम्या /बातम्या /मनी /'एक सायकल, जो बदल दे आपका करिअर'; भावाच्या हट्टातून सुचली कल्पना, दरमहा होतेय 1 लाखांची कमाई

'एक सायकल, जो बदल दे आपका करिअर'; भावाच्या हट्टातून सुचली कल्पना, दरमहा होतेय 1 लाखांची कमाई

वडोदराच्या एका तरुणानं स्वतः इलेक्ट्रिक सायकली तयार करून विकायला सुरुवात केली आणि बघता बघता त्याचा व्यवसाय प्रचंड यशस्वी होत असल्याचं लक्षात आलं.

वडोदराच्या एका तरुणानं स्वतः इलेक्ट्रिक सायकली तयार करून विकायला सुरुवात केली आणि बघता बघता त्याचा व्यवसाय प्रचंड यशस्वी होत असल्याचं लक्षात आलं.

वडोदराच्या एका तरुणानं स्वतः इलेक्ट्रिक सायकली तयार करून विकायला सुरुवात केली आणि बघता बघता त्याचा व्यवसाय प्रचंड यशस्वी होत असल्याचं लक्षात आलं.

वडोदरा, 7 जुलै : पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel) किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत चालल्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. त्यात पर्यावरणाच्या हानीचा प्रश्नही पेट्रोल-डिझेलमुळे वाढत आहे. या सर्वावर इलेक्टिक सायकल (Electric Cycle) हा उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे. वडोदराच्या (vadodara) एका तरुणानं स्वतः अशा सायकली तयार करून विकायला सुरुवात केली आणि बघता बघता त्याचा व्यवसाय प्रचंड यशस्वी होत असल्याचं लक्षात आलं.

अशी सुचली कल्पना

वडोदऱ्यात राहणाऱ्या 25 वर्षांच्या विवेकनं काही वर्षांपूर्वी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्यानं स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र त्यात त्याला यश आलं नाही. काही उद्योग पैशांअभावी बंद पडले, तर काही प्रयोगांना प्रतिसादच न मिळाल्यामुळे ते पुढे चालू शकले नाहीत. याच काळात विवेकच्या छोट्या भावानं शाळेला जाण्यासाठी स्कूटरचा हट्ट करायला सुरुवात केली होती. त्याचा हट्ट पुरवण्यासाठी विवेकनं एक कल्पना लढवली आणि त्याच्या जुन्या सायकलची डागडुजी करून त्यापासून एक इलेक्ट्रिक सायकल तयार केली. ही सायकल त्याच्या भावाला मनापासून आवडली.

ऑनलाईन लोकप्रियता

या सायकलचे काही फोटो काढून त्याने सोशल मीडियावर अपलोड केले आणि बघता बघता त्याला अनेकांची पसंती मिळत असल्याचं लक्षात आलं. दुबईत काम करणाऱ्या विवेकच्या काकांनी त्याला आणखी एक अशाच प्रकारची सायकल तयार करायला सांगितलं. त्यानं सायकल तयार करून पाठवून दिली. त्यानंतर तर विवेकचा आत्मविश्वास अधिकच वाढला आणि त्याला छोट्यामोठ्या ऑर्डर्सही यायला सुरुवात झाली.

पहिली मोठी ऑर्डर

एका स्थानिक तालमीनं कुस्तीच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यातील विजेत्यांना बक्षीस म्हणून देण्यासाठी 10 सायकली तयार करण्याची ऑर्डर विवेकला मिळाली. या सायकली तयार करून वेळेपूर्वीच त्याने डिलिव्हर केल्या आणि त्याचा चांगला मोबदला त्याला मिळाला. त्यानंतर त्याने अधिकृतरित्या हा व्यवसाय ऑनलाईन सुरू केल्या आणि देशभरातून वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स यायला सुरुवात झाली.

हे वाचा -Cyber Fraud:जेवण ऑर्डर केलं अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला सॉफ्टवेअर इंजिनियर

असा चालतो व्यवसाय

ज्यांना ही सायकल हवी असते, ते ऑनलाईन ऑर्डर करू शकतात. साधारण 25 हजार ते 40 हजार अशी या सायकलींची किंमत असते. ओडो बीक या नावानं विवेक सायकली विकतो. सायकलची ऑर्डर घरी आल्यानंतर ग्राहक स्वतः ही सायकल असेंबल करू शकतात. काही शंका आली तर व्हिडिओ कॉल करून त्यांना मार्गदर्शन करण्यात येतं. विवेकचा हा व्यवसाय सध्या तेजीत असून महिन्याकाठी 1 लाखांपर्यंत नफा मिळत असल्याचं तो सांगतो. कोरोना काळामुळे मागणी काहीशी कमी असली तरी लवकरच ती वाढेल, असा विश्वास त्याला आहे.

First published:
top videos

    Tags: Electric vehicles, Startup