क्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा, सीबीआयकडून गुन्हा दाखल

क्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा, सीबीआयकडून गुन्हा दाखल

क्वॉलिटी लिमिटेड या कंपनीवर बँक ऑफ इंडियाच्या अंतर्गत असलेल्या बँकांच्या गटांनी तक्रार दाखल केली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : आइस्क्रीम उत्पादन क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या क्वॉलिटी वॉल्स लिमिटेडमध्ये तब्बल 1400 कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी सीबीआयने धाडी टाकल्या आहेत.

दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार,  क्वॉलिटी वॉल्स लिमिटेड या कंपनीवर 1400 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याच्या आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सीबीआयने दिल्ली, बुलंदशहर, सहारनपूर, अजमेर, पालवाल या ठिकाणी छापे टाकले आहेत.

मोठी बातमी! संदीप देशपांडेसह आणखी 3 मनसैनिकांना पोलिसांनी केली अटक

क्वॉलिटी लिमिटेड या कंपनीवर  बँक ऑफ इंडियाच्या अंतर्गत असलेल्या बँकांच्या गटांनी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे  क्वॉलिटी लिमिटेड कंपनीचे संचालक संजय धिंग्रा, सिद्धांत गुप्ता, अरुण श्रीवास्तव यांच्यासह इतर सदस्यांची नावे तक्रारीत समोर आली आहे. त्यामुळे सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

बँकेचा पैसा हा इतर खात्यात वळवणे, बनावट कागदपत्रे, खोटी बिलं तयार करणे आणि खोटी संपत्ती दाखवण्याचा गैरव्यवहार झाल्याचा बँकांनी म्हटले आहे. यामध्ये  कॅनरा बँक, आंध्र बँक, बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, धनलक्ष्मी बँक, सिंडिकेट बँक यांचा समावेश आहे.

तुम्हाला माहित आहे का 'आशालता' यांच्या नावामागचं गुपित?

बँकांनीच आरोप केल्यामुळे सीबीआयने अखेर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे सीबीआयने देशभरातील क्वालिटी लिमिटेडच्या कार्यालयावर धाडी मारण्याचे काम सुरू केले आहे.

त्याचबरोबर या  क्वॉलिटी कंपनीने खरंच गैरव्यवहार केला आहे का? क्वालिटी लिमिटेडच्या संचालकांसोबत इतर कोण-कोण लोकं सहभागी आहे. याचा शोध घेऊन कंपनीतील इतर अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. तर अद्याप  क्वॉलिटी कंपनीने  या प्रकरणाबद्दल आपली कोणतीही भूमिका मांडली नाही.

Published by: sachin Salve
First published: September 22, 2020, 10:58 AM IST
Tags:

ताज्या बातम्या